|
सांगलीः महाराष्ट्र सरकार मध्ये खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत. आम्ही बच्चू कडूना उद्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करत होतो , पण त्यांनी राज्यमंत्री पदावर समाधान मानले , आता त्यांनी किती ही मोर्चे काढले तरी बुंद से गयी वो हौद से नहीं आती , त्यांची आता शेतकऱ्यांच्यात पत राहिली नाही अशी रघुनाथदादा पाटील यांची टीका , तर शरद जोशी , जॉर्ज फर्नांडिस, दत्ता सामंत या तिघांनी घेतलेल्या शेतकरी कामगार एकीकरणाच्या कार्यक्रमावर एक जोशी आणि दोन रामोशी अशी टीका बाळासाहेब ठाकरे यांनी केली असल्याचे सांगत, सध्या त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस जोशी आणि उर्वरित दोघा उपमुख्यमंत्र्यांचा रामोशी असा अप्रत्यक्ष उल्लेख करत केली टीका
महाराष्ट्र सरकार मध्ये खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत. 105 लोकं ज्यांची आहेत त्यांचीच सत्ता आहे. त्यांनी या लोकांना खेळवले आहे. त्यांना सत्तेमध्ये काही सहभाग नाही. देवेंद्र फडणवीस च खरेकर्ते आहेत , आणि यांच्याकडून करवून घेत आहेत. असे वक्तव्य रघुनाथदादा पाटील यांनी इस्लामपूर येथे बोलताना केले आहे. नुकताच त्यांनी तेलंगणा चे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केल्यानंतर आज सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते , त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बच्चू कडू हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. आम्ही त्यांना उद्याचा मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करत होतो कारण त्यांचा भाऊ हा शेतकरी संघटनेचा आहे. पण आता त्यांनी राज्यमंत्री पदावर समाधान मानल्यामुळे त्यांची शेतकऱ्यांच्यात पत राहिली नाही. बुंद से गयी वो हौद से नहीं आती , अशी टीका नुकताच बीआर एस पक्षात प्रवेश केलेले शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी शेतकरी मेळाव्यात बोलताना केले आहे. तर मुंबईत काही वर्षांपूर्वी शरद जोशी दत्ता सामंत , जॉर्ज फर्नांडिस यांनी घेतलेल्या शेतकरी कामगार मेळाव्यावर एक जोशी आणि दोन रामोशी एकत्र आल्याची टीका शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिक मध्ये केली असल्याची आठवण ही रघुनाथदादांनी यावेळी सांगितली. आणि अप्रत्यक्ष पणे देवेंद्र फडणवीस हे जोशी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री रामोशी असल्याचं सूचित केलं.
वाचल्या गेलेल्या अन्य बातम्या– सुरत पाकिस्तानात आहे का?–नाना पटोले; का म्हणाले पटाेले असे वाचा सविस्तर
रघुनाथ दादा पाटील (शेतकरी नेते ) काय म्हणाले पहा.. निळ्या लिंकवर क्लिक करा…
अधिकाधिक सकारात्मक बातम्या व पाँझिटीव्ह तसेच हटके स्टाेरीज वाचा,आजच सबस्क्राईब करा. लाईक करा. फाँरवर्ड करा
|
VIDEO पहा…आम्ही बच्चू कडूना उद्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करत होतो, मात्र; त्यांनी!-रघुनाथदादा पाटील
पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.















































































