शिरपूर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शहर कार्यकारणी जाहीर…
शिरपुर (गोपाल के. मारवाड़ी) – शिरपुर शहर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या शहराध्यक्ष पदी हिराभाऊ कोळी यांची निवड महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, नंदुरबारचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिलदादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे यांच्या आदेशाने २० जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनिलदादा पाटील तसेच शिरपुर तालुका अध्यक्ष बाळकृष्ण कौतिक पाटील यांनी शिरपूर शहर कार्यकारणी जाहीर केली.
यात शिरपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते हिराभाऊ कोळी (वाकडे) यांची शहराध्यक्षपदी आणि युवराज राजपुत यांची शहर कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. सुधीर पाटील,अर्थे, तालुका उपाध्यक्ष मंगेश भैरव, वाघाडी ओबीसी सेल, तालुकाध्यक्ष, राजेंद्र बोरसे, शिरपुर यांची ओबीसी सेल कार्याध्यक्ष या नवनियुक्त पदाधिकारीचे नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यांत आला.
यावेळी मदत व पुनवर्सन मंत्री अनिलदादा पाटील व तालुकाध्यक्ष बाळकृष्ण पाटील यांनी नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हिराभाऊ कोळी (वाकडे) हे युवा आणि धडाडीचे तसेच एकनिष्ठ कार्यकर्ते असून दि शिरपुर मर्चंटस को-ऑप बँक बचाव समितीचे पदाधिकारी आहेत. सामाजिक क्षेत्रात तसेच अन्याय आणि भ्रष्टाचार विरोधात त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. त्यांचे आणि सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.