पाणी घराघरात… नागरिक पाण्यात ; अधिकारी कर्मचारी आरामात!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

*महामार्गाचे काम, प्रशासनाची झोप – इंदिरानगर झोपडपट्टीत पावसाचं पाणी घरात*

*शिरोली – नागाव (रुपेश आठवले)

पुणे-बेंगळोर राष्ट्रीय महामार्गालगतच्या इंदिरानगर झोपडपट्टीतील घरामध्ये पावसाचं पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वळवाच्या पावसात रस्त्याचे

चालू असलेले काम व गटारींच्या अडथळ्यांमुळे पाणी झोपड्यांमध्ये घुसले आहे.

सेवा रस्त्यावर पाणी साचले, निचऱ्याचा मार्ग बंद!
महामार्गालगत सेवा रस्त्यावर साचलेले पाणी गटारी न साफ केल्यामुळे झोपडपट्टीत घुसले. नागरिकांना आता चिखलयुक्त पाण्यात राहावे लागत असून, ये-जा करताना रोगराई पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

आरोग्यावर संकट – प्रशासन कोठे आहे?
या झोपडपट्टीत लहान मुले, महिला आणि वृद्ध लोक असुरक्षित अवस्थेत राहत आहेत. रोगराई पसरू नये म्हणून औषध फवारणी व आरोग्य उपाय तातडीने करणे अत्यावश्यक आहे.

ग्रामपंचायत आणि महामार्ग प्राधिकरण जबाबदार
नागाव ग्रामपंचायत व रस्ते विकास महामंडळाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. स्थानिक नागरिक व POSITIVE WATCH च्या शासन मित्र पथकाने या गंभीर बाबीकडे लक्ष वेधून पाणी निचरा, रस्ता व्यवस्थापन आणि नागरिकांचे आरोग्य यासाठी तत्काळ कृतीची मागणी केली आहे.

वाहनधारकही धोक्यात
महामार्गालगतच्या उड्डाण पुलाखाली गटारी पाण्याखाली गेल्यामुळे वाहनधारकांनाही धोका निर्माण झाला आहे. अपघाताचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.

मातंग समाज हा बौद्धांचा छोटा भाऊ…सत्ताधारी लोक आपल्याकडे येणार नाही

POSITIVE WATCH – न्यायासाठी सजग नजर

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.