पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
“सेवा पंधरवड्यात समर्पित भावनेने काम करा” – जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक व्हावे, सामान्य जनतेला दिलासा मिळावा या उद्देशाने राज्यभर ‘सेवा पंधरवडा’ राबविण्यात येत आहे. १७ सप्टेंबर (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस) ते २ ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती) या कालावधीत हा उपक्रम तीन टप्प्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या काळात सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी “समर्पित भावनेने काम करावे” असे आवाहन केले आहे.
सर्वांसाठी घरे – अतिक्रमणधारकांना पट्टे वाटप, जमिनीची नोंदी अद्ययावत करणे
नाविन्यपूर्ण उपक्रम – नशामुक्ती रॅली, प्लॅस्टीकमुक्ती, चित्रकला व निबंध स्पर्धा, सेवा हमी कायदा जनजागृती
निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली म्हणाले :
“सेवा पंधरवड्याचा कृती आराखडा ठोस पद्धतीने तयार करण्यात आला आहे. याची प्रभावी अंमलबजावणी करून कोल्हापूर जिल्हा संपूर्ण अभियान राबविण्यात अग्रेसर राहील.”
प्रमुख दिनांक व उपक्रम
१७ सप्टेंबर : पाणंद रस्ते सर्वेक्षण प्रारंभ
२१ सप्टेंबर : अतिक्रमण हटाव व रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण
२४-२५ सप्टेंबर : प्लॅस्टीकमुक्ती निबंध स्पर्धा व पथनाट्य
२६ सप्टेंबर : अतिक्रमणधारकांना पट्टे वाटप
२७ सप्टेंबर : किल्ले पन्हाळगड येथे चित्रकला स्पर्धा
२८ सप्टेंबर : जिल्हास्तरीय नशामुक्ती रॅली
२९ सप्टेंबर : माहिती अधिकार व सेवा हमी कायदा जनजागृती
२ ऑक्टोबर : फलनिष्पत्ती व समारोप
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.