समाज बांधवांसाठी GOOD NEWS_ तारीख निश्चित; एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर ऐतिहासिक घोषणा!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन – 

काेल्हापूर- ओंकार काळबेरे |
संत परंपरेचा तेजस्वी वारसा जपणाऱ्या आणि लाखो भाविकांच्या अंतःकरणाशी नाते जोडणाऱ्या संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाच्या प्रतीक्षेची अखेर सांगता झाली आहे. आज एकादशीच्या शुभ दिवशी, हा ऐतिहासिक सोहळा १७ व १८ जानेवारी २०२६ रोजी होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

या घोषणेमुळे संत नामदेव महाराजांचे विचार आत्मसात करणाऱ्या भाविकांमध्ये अपार आनंद आणि उत्साह संचारला असून, महाराष्ट्रासह देशभरातून या महासंमेलनात सहभागी होण्यासाठी भाविक सरसावले आहेत.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

या महासंमेलनामध्ये संत नामदेव महाराजांच्या भक्ती, समता, एकात्मता आणि मानवतेच्या अमर संदेशाचा जागर करण्यात येणार असून, विविध सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा ध्वज उंचावला जाणार आहे.

या पवित्र उपक्रमासाठी देशातील अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार आहे. यात विशेषतः पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, इतर राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच पूज्यनीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांचा सहभाग अपेक्षित आहे.

संत परंपरेचा वारसा हे केवळ आपले आध्यात्मिक भांडार नसून, तो सामाजिक एकतेचा आधार आहे. या महासंमेलनाद्वारे नव्या पिढीपर्यंत हे मूल्य पोहोचवण्याचा आणि समाजात सद्भावनेचा संदेश रुजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

आपली उपस्थिती हे या उपक्रमाचे सामर्थ्य ठरणार आहे.
महासंमेलन आयोजन समितीने देशभरातील कार्यकर्त्यांना आणि समाजबांधवांना आवाहन केले आहे की त्यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, इतरांनाही सहभागी करून घ्यावे आणि या ऐतिहासिक संमेलनाचा भाग व्हावे.

संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन – हे केवळ एक सोहळा नसून, संत विचारांचे राष्ट्रीय जागरण ठरणार आहे!

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.