आचारसंहितेपूर्वी महापालिका कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवावा———–राज्याध्यक्ष संतोष पाटील.
(मिरज: D सूर्यकांत)--सांगली महापालिकेसमोर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे बदली,मानधन व रोजंदारी कर्मचाऱ्यांनी महापालिकेत कायम स्वरूपी सेवेत रुजू करून घ्यावे या मागणीसाठी सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्रीराम सासणे हे स्वतः आमरण उपोषणास बसले आहेत. या ठिकाणी आज श्रमजीवी कष्टकरी कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष संतोष पाटील यांनी आज भेट देऊन त्यांना पाठिंबा दर्शवला.
राज्याध्यक्ष संतोष पाटील म्हणाले की या ठिकाणी राज्य सरकारी गट ड(चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या वतीने सांगली शहराचे जिल्हाध्यक्ष मा.श्रीराम सासणे याने सुरू केलेल्या अमर उपोषणास माझा पाठिंबा राहील व ते पुढे म्हणाले की सांगली नगरपालिका झाल्यापासून ते आतापर्यंत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील मानधन,बदली, रोजंदारी, कर्मचाऱ्यांना 50-50 वर्ष होऊन गेली त्यांची दुसरी तिसरी पिढी काम करत आहे.तरी ही त्यांना कायम स्वरूपी महापालिकेत कायम सेवेत रुजू करून घेतले नाही. महापालिकेकडून दिनांक 24/09/2024 रोजी महासभेच्या ठरावानुसार महाराष्ट्र शासनास एक प्रस्ताव पाठवण्यात आला आहे यामध्ये बदली रोजंदारी व मानधन कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी सेवेत रुजू करून घेण्याची आश्वासन नगर विकास खात्याचे सचिव गोविंदराज व पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी आश्वासन दिले आहे.

- तरीही अद्याप नगर विकास खात्याने या कर्मचाऱ्यांना सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत कायम स्वरूपी सेवेत रुजू करण्यासाठी जीआर काढला नाही त्यामुळे सांगली महापालिकेसमोर या आपण करत असलेल्या आंदोलनास माझा पाठिंबा आहे व भविष्य काळामध्ये याआपल्या मागण्या मान्य नाही केल्यास येणाऱ्या काळात महापालिकेच्या आयुक्तांना भेटून याबाबत चर्चा करणार आहे.जर याच्या वरती चर्चा करूनही या कर्मचाऱ्यांचा विषय नाही सोडवल्यास महापालिकेसमोर भविष्यकाळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व ह्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मी आपल्या पाठीशी असणार अशी मी ग्वाही देतो.
- या वेळेला सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष मा.विनोद तिवडे,सचिव अक्षय काटे, मेजर आकाश तिवडे व अनेक महिला कर्मचारी उपस्थित राहून महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या व लवकरात लवकर आमचा प्रश्न सोडवावा असे सांगितले.