समिती आली.. बस स्थानकाची पाहणी केली आणि…!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापूर बस स्थानकावर स्वच्छता, सुशोभीकरण आणि प्रवासी सुविधांवर भर; सर्वेक्षण समितीचा सकारात्मक अहवाल

कोल्हापूर (रुपेश आठवले) माननीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत कोल्हापूर बस स्थानकावर आज सर्वेक्षणाचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पडला. सर्वेक्षण पथकाने बस स्थानक आगाराची स्वच्छता, सुशोभीकरण, तसेच प्रवासी सुविधांची पाहणी करून मूल्यांकन केले.

मूल्यांकन समितीमध्ये उपमहाव्यवस्थापक अनघा बारटक्के, प्रादेशिक अभियंता अशोक पन्हाळकर, ज्येष्ठ पत्रकार अजय केळकर, प्रवासी मित्र सोमनाथ कुंभार यांचा समावेश होता.

ST ने केले आवाहन- Msrtc Mobile Reservation App वापरा! आली रे आली हाेळी… जावा काेकणात साेडल्या बसेस जादा!

यावेळी यंत्र अभियंता यशवंत कानतोडे, आगार व्यवस्थापक अनिल मेहत्तर व प्रमोद तेलवेकर, पालक अधिकारी संतोष बोगरे, मल्लेश विभूते, संकेत जोशी, विजय निगडे, दीपक घारगे, शेखर सुर्वे, अमित तावडे उपस्थित होते.

बस स्थानकाच्या स्वच्छता व सुशोभीकरणावर समितीकडून समाधान व्यक्त करण्यात आले. तथापि, वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन या सुविधांची वाढ कशी होईल, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना समितीने दिल्या.

ST विभागागाची लाल परी हिरमुसली जाता जाता! काय म्हणावं या कारभाराला… एका चाकाचे पंचर काढायला लागली सहा तास

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.