“भारत जिंदाबाद…”नाद नाही करायचा… भारताचा”, “पीओके ताब्यात घ्यावा”

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

रिपब्लिकन पार्टी (आठवले)च्या वतीने ‘भारत जिंदाबाद यात्रेचा’ समारोप
कोल्हापूर:(रुपेश आठवले)

काश्मीरमधील पैलगाम या पर्यटनस्थळी निष्पाप २८ भारतीयांची हत्या करणाऱ्या पाकपुरस्कृत अतिरेकी टोळ्यांविरोधात आणि त्यांच्या नऊ अड्ड्यांवर अचूक व भेदक कारवाई करणाऱ्या भारतीय लष्कराच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या संकल्पनेतून ‘भारत जिंदाबाद यात्रा’ आयोजित करण्यात आली होती. या यात्रेचा समारोप आज कोल्हापूरमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.

दसरा चौक येथून छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली. सीपीआर चौक, गंगाराम कांबळे स्मारक, महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत भवानी मंडप मार्गे ऐतिहासिक बिंदू चौकात यात्रेचा समारोप झाला.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांती स्तंभाला अभिवादन करून समारोप सभेला सुरुवात झाली. स्वागत व प्रस्ताविक जिल्हा सचिव आणि रॅली संयोजक सतीश माळगे यांनी केले.

  • राज्य संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, भारतावर वारंवार होणारे अतिरेकी हल्ले हे पाकिस्तान लष्कराच्या सहकार्याने होत आहेत. हे अतिरेकी संपूर्ण जगाची शांतता भंगवतात. अशा अतिरेक्यांचा कायमचा बंदोबस्त करणे गरजेचे असून, भारतीय लष्कराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जी कामगिरी केली ती कौतुकास्पद आणि प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावी अशी आहे.

महाराष्ट्र राज्य सचिव बी. के. कांबळे यांनी सांगितले की, रिपब्लिकन पक्षाने नेहमीच राष्ट्रीय अभिमान आणि हिताचे कार्य केले आहे. भारतीय लष्कराच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी ही यात्रा घेण्यात आली असून, आज ती यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.

सभेत जिल्हा उपाध्यक्ष संजय जिरगे, कबीर नाईकनवरे, चरणदास कांबळे, किरण नामे, नामदेव कांबळे, कुंडलिक कांबळे, सलमान मौलवी यांनीही आपले विचार व्यक्त केले. जिल्हा उपाध्यक्ष दीपक भोसले यांनी आभार प्रदर्शन केले.

या वेळी होलार आघाडीचे लक्ष्मण पारसे, शाम लाखे, ज्येष्ठ नेते राजू भडंगे, दिलीप कोथळीकर, सुरेश शिरोलीकर, सरदार कांबळेशाहूवाडीकर, सुनील कांबळे, सुहास हुपरीकर, शिरीष थोरात, खंडेराव कुरणे, रोहित कांबळे, तुषार नाईकनवरे, राहुल गलगले, गणेश भोसले, सागर भोसले, आकाश पवार, बाबासो कांबळे, संदीप कांबळे, सुरज तांमगावकर, अमोल गवळी, अनिल नलावडे, रवी शिवशरण, रुपेश आठवले, सरदार आमशीकर यांच्यासह ४०० ते ५०० रिपब्लिकन सैनिक सहभागी झाले होते.

“नाद नाही करायचा… भारताचा”, “पीओके भारताच्या ताब्यात घ्यावा”, “भारत जिंदाबाद”, “भारतीय सैन्य दलाचा विजय असो”, “रिपब्लिकन पार्टीचा विजय असो”, “आठवले साहेब आगे बढ़ो” अशा घोषणा देत परिसर दणाणून गेला.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.