जनता दलाच्या पाठींब्याने राधानगरीत केपींच्या अडचणीत वाढ तर आबीटकरांना बळ…
सरवडे – राधानगरी तालुक्यातील जनता दल सेक्युलर पक्षाच्या वतीने आमदार प्रकाश आबिटकर यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी बोलताना बिद्री चे माजी उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे यांनी सरवडे जिल्हा परिषद मतदार संघात उच्यांकी मताधिक्य देणार असल्याची घोषणा केली. जनता दल व विठ्ठलराव खोराटे यांच्या पाठींब्याने राधानगरीत केपींच्या अडचणीत वाढ झाली आहे.तर आबीटकरांना बळ मिळाले आहे.
पुढे बोलताना खोराटे म्हणाले, राधानगरी मतदार संघाची रचना विस्ताराने मोठा व २७२ किमी लांबीचा असा अवघड मतदार संघ आहे. अशा या दुर्गम मतदार संघातील प्रत्येक गावात आमदार प्रकाश आबिटकर यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली. अतिशय दुर्गम समजल्या जाणाऱ्या वाकीघोलातील सर्व रस्ते आमदार आबिटकर यांनी चकाचक केले आहेत. विरोधकांनी कोणतेही काम केले नाही त्यांच्याकडे बिद्रीची सत्ता असल्याने मोठी झुल चढली आहे. मतदार संघातील माणसांना कोण काय केलं याची चांगली माहिती आहे. आमदार आबिटकर कामाचे आमदार आहेत. प्रत्येक मतदारांशी संपर्क साधून आमदारांनी केलेले काम तळागाळातील माणसांपर्यंत पोहचवा. लाडकी बहिण योजनेमुळे सर्वसामान्य माणसांच्या अर्थकारणाला चांगली गती मिळाली आहे. चांगले निर्णय घेतल्यामुळे महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सरवडे जिल्हा परिषद संघातील जनता आमदार प्रकाश आबीटकर यांच्या पाठीशी असून मोठे मताधिक्य देणार असल्याचे श्री. खोराटे यांनी सांगितले.
उमेदवार आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, राजकारण, समाज कारणातले आदर्श व्यक्तिमत्व म्हणून खोराटे साहेब यांच्याकडे पाहतो. मी तुमच्यातलाच एक आहे. तुमच्याकडूनच मला विचारांचे बाळकडू मिळाले. याबद्दल आयुष्यभर कृतज्ञ राहिन. स्वर्गीय आमदार शंकर धोंडी पाटील यांच्या प्रचारासाठी हातात माईक घेऊन वाड्या-वस्त्या पिंजून काढल्या. त्यांच्या विजयात गुलालात रंगून मीच आमदार झाल्यासारखे नाचत होतो. हीच समाजवादी जनता माझ्याबरोबर आहे.वेगवेगळ्या विचाराचे लोक एकत्र एकवटले आहेत. के. पी. पाटील यांनी दहा वर्षांत जे करायला पाहिजे होत ते केलं नाही फक्त आणि फक्त स्वतःच हित जोपासले. सर्व कामांचे मुल्यमापन जनता करते. समाजाचं काम करणारा व लोकांना अपेक्षित असणारा विकास करतोय. सर्व कामांना गती देण्याचे काम करतोय. भविष्य काळात या मतदारसंघाला सुजलाम, सुफलाम करण्यासाठी काम करुया. लोकांच्यातून खुप चांगला प्रतिसाद मिळतोय. लोकसभेला माणसं थांबत नव्हती. आता मात्र माणसं थांबून प्रतिसाद देत आहेत. पैसा, सत्ता हे बाजुला ठेवून माझ्या सारख्या सामान्य माणसा बरोबर जनता आहे. अभुतपुर्व विजय मिळवण्यासाठी जनता दल पक्षाच्या पाठींब्याने मोठे बळ मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कासार पुतळेचे माजी सरपंच सिताराम खाडे, एच. डी. पाटील, ॲड. विलास कवडे, तालुका संघाचे संचालक श्रीकांत साळोखे यांची भाषणे झाली. यावेळी नंदकिशोर सुर्यवंशी-सरकार, दत्तात्रय उगले, अरुणराव जाधव, ॲड.प्रशांत भावके, शाकीर पाटील-तुरंबे, धैर्यशील भोसले, सुभाष पाटील-मालवेकर, विलास येरुडकर, मधुकर कांबळे, राधानगरी संघाचे संचालक दत्तात्रय धनगर, वैशाली पाटील, राजाराम देवर्डेकर, शुभम पाटील, सुनील गुरव, प्रकाश पाटील, मानसिंग खोराटे, संदीप खराटे, बी. टी. मुसळे, सचिन एकसिंगे, सचिन सुतार, संजय पवार, सिताराम खाडे, बंडोपंत पाटील, सुनील गुरव, सात्ताप्पा गुरव, सिताराम खाडे, जी.डी.पाटील आदींसह जनता दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवराज खोराटे. प्रास्ताविक केले. आभार शुभम पाटील यांनी मानले.
ऋषीतुल्य नेतृत्व…
आम्ही लहानाचे मोठे डाव्या विचारसरणीत मोठे झालो त्यामुळे जनता दल हा पक्ष आम्हाला घरचा वाटतो, सामान्य माणसासाठी कार्यरत रहाण्याचा वसा आम्ही समाजवादी नेत्यांच्या कडुन घेतला असुन जेष्ठ नेते विठ्ठलराव खोराटे ऋषीतुल्य नेतृत्व असल्याच्या गौरवौद्गार आमदार प्रकाश आबीटकर यांनी काढले.
जनता आबीटकरबरोबरच…
मतदारसंघातील बहुतांश प्रस्थापीत नेते जरी के. पी. पाटील यांच्या बरोबर असले तर सामान्य जनता आमदार प्रकाश आबीटकर यांच्या बरोबर असल्याचा उल्लेख जनता दलाच्या वक्त्यांनी आपल्या भाषणात केला.