पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
गांजा विक्रीसाठी आलेला शिरोळचा व्यापारी शाहूपुरी पोलिसांच्या जाळ्यात
कोल्हापूर : तावडे हॉटेलजवळील सर्व्हिस रोडवर गांजा विक्रीसाठी आलेल्या शिरोळ तालुक्यातील एका इसमाला शाहूपुरी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईत सुमारे २२ हजार रुपये किमतीचा १ किलोपेक्षा जास्त गांजा जप्त करण्यात आला आहे.शाहूपुरी हद्दीत सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता ही कारवाई झाली. आरोपी दिलदार चवगोंडा कांबळे (वय ४०, धंदा लाकूड विक्री, रा. उमळवाड, शिरोळ) हा संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
तपासणीअंती त्याच्याकडून पारदर्शक प्लॅस्टिक पिशवीत सुमारे १ किलो २०४ ग्रॅम वजनाचा ओलसर गांजासदृश्य अंमली पदार्थ सापडला. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव करत आहेत. कारवाईत भैरू माने, मिलींद बांगर, महेश पाटील, राहुल पाटील, बाबासाहेब ढाकणे, सुशीलकुमार गायकवाड, अमोल पाटील, सनिराज पाटील, कृष्णात पाटील, रविकुमार आंबेकर व मंजर लाटकर यांनी सहभाग घेतला.या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.