गद्दारांनी घात केला नसता तर मी शेतकऱ्यांचं भलं केल असते…
हिंगोली – आमच्याच पक्षातील काही गद्दारांनी घात केला नसता तर मी मुख्यमंत्री असतो तर महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे भले केलं असतं असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिनांक 27 ऑगस्ट रोजी रविवारला रामलीला मैदानावर निर्धार सभेच्या वेळी असे बोलताना म्हणाले. पुढे बोलताना म्हणाले आजही आमच्यासोबत निष्ठावंत कार्यकर्ते आहे जिल्ह्यात शिवसेनेसोबत मोठी ताकद नव्या दमाने तयार झाली असल्याची जाणीव त्यांनी करून दिली. रामलीला शिवसैनिकांनी फुलले होते.
![]() |
![]() |
दुपारी दोन वाजता होणारी सभा ही दोन तास उशिराने झाली असली तरी ग्रामीण भागातून हजारो शिवसैनिक शहरात रामलीला मैदानावर दाखल झाले होते. त्यांना उत्सुकता होती जिल्ह्यातील गद्दाराबद्दल काही बोलतील परंतु माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यासपीठावर येताच 50 खोके एकदम ओके अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. मी गद्दाराबद्दल बोलून वेळ वाया घालणार नाही. आणि त्याबद्दल मी बोलणारही नाही. पुढच्या काही दिवसात लोकसभा विधानसभा नगरपालिका जिल्हा परिषद या निवडणुका येणार आहेत गद्दाराला आपली ताकद दाखवून धडा शिकवा हे मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे. त्यात आता ट्रिपल इंजिन सरकार आले आहे. हे सरकार नुसत्या वाफा सोडत आहे म्हणून हे वाफेचे सरकार आहे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. या सरकारच्या योजना सरकार आपल्या दारी थापा मारतोय भारी असे आहेत हे आता भाजपाचे कार्यकर्ते घराघरात सांगत हिंडत आहेत. त्यांना म्हणावं पहिले स्वतःच्या घरात कोणती योजना आणली ती बघा नंतरच दुसऱ्याच्या घरात बघा. या भाजपवाल्यांना बाहेरचे नेते लागतात. गद्दारांना माझा बाप लागतो. मग कोठे यांची ट्रिपल इंजिन सरकार उभे राहते. आता इंडिया या नावाने देश वाचवण्यासाठी तुमच्यासमोर एकत्र येत आहोत केंद्र सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
मटक्याचा अड्डा चालवणाऱ्याला तुम्ही हिंदुत्व म्हणणार आहात का? आमचं हिंदुत्व म्हणजे गरीबाच्या हाताला काम देणार आहे. तुम्ही कोण ठरवणार घराणे शाही चालत नाही म्हणून ती आता महाराष्ट्रातली जनता ठरवेल असेही गद्दारांना त्यांनी ठणकावून सांगितले. या निर्धार सभेच्या वेळी शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विनायक राऊत माजी खासदार सुभाष वानखेडे डॉक्टर माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा जिल्हा संपर्कप्रमुख बबन थोरात, नागेश अष्टीकर शिवसेना जिल्हाप्रमुख विनायक भिसे, संदेश देशमुख, बी डी चव्हाण, सुनील काळे परमेश्वर मांडगे गणेश शिंदे या निर्धार सभेच्या वेळी उपस्थित होते.