सुनिल सरदार..अविनाश खडके यांना विशेष पुरस्काराने सन्मानित

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

सुनिल सरदार… अविनाश खडके यांना मिळाला विशेष पुरस्कार…

“नम्रता गारमेंट” चा उद्घाटन व समाजभूषण पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न – विविध मान्यवरांचा सत्कार

कोल्हापूर | टीम पाँझिटीव्ह वाँच

युनायटेड रिपब्लिकन पार्टी, वसुंधरा बहुद्देशीय सेवा भावी संस्था कोल्हापूर आणि बरेच काही फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “नम्रता गारमेंट” चा उद्घाटन सोहळा आणि समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी,  कोल्हापुरातील सर्किट हाऊस शासकीय विश्रामगृह येथे उत्साहात पार पडला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आ. अशोकराव माने, आ. चंद्रदीप नरके आणि केडीसीसी बँकेचे संचालक भैय्या माने यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. तानसेनभाई ननावरे यांनी भूषवले.

उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधून समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना “समाजभूषण पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. यावेळी सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. काेल्हापूर येथील भूमि टूर्स अँन्ड ट्रँव्हलसचे मालक सुनिल सरदार व आर. आर अँकडमीचे अविनाश खडके यांनाही विशेष पुरस्कार देऊन यावेळी गाैरविण्यात आले. अविनाश खडके यांनीही अँकडमीच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक वाटचाल करीत, गाेरगरिब मुलांना जीवनात नवी दिशा दाखविण्याचे तसेच वैविध्यपूर्ण प्रशिक्षण देत, समाजामध्ये एक नवा ठसा उमटविला आहे. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन सरदार, खडके यांच्यासह अन्य मान्यवरांना या वेळी फाऊंडेशनच्यावतीने गाैरविण्यात आले.

भूमी टूर अँड ट्रॅव्हल्स शुभम सरदार, ऐश्वर्या सरदार, सुनिल सरदार यांनी अनेक धार्मिक, सामाजिक, जेष्ठ नागरीक, महिला मंडळ, शाळेय सहली यशस्वी करून केल्या आहे. सरदार यांनी काशी हिंदू विश्वविद्यालय वाराणसी येथेही शालेय मुलांची सफर घडवून आणली होती. या त्यांच्या सेवाभावी कामगिरीची दखल घेऊन सुनील सरदार, शुभम सरदार यांना सन्मानित करण्यात आले. 

कार्यक्रमाचे आयोजन अविनाश कांबळे (जिल्हाध्यक्ष, युनायटेड रिपब्लिकन पार्टी) आणि ज्योत्स्ना बनसोडे (जिल्हा महिला अध्यक्षा) यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन पृथ्वीराज कोळकर यांनी केले.कार्यक्रमाच्या निमित्ताने नम्रता गारमेंट (पाडळी खुर्द, ता. करवीर, जि. कोल्हापूर) या नवीन औद्योगिक उपक्रमाची सुरुवात झाली असून, स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.या प्रसंगी विविध विभागांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, महिला प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.