आता नवीन आकृतीबंधा नुसार होणार पोलीस शिपायांची भरती…

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

आमदार सतेज पाटील यांच्या लक्षवेधीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महिती…

कोल्हापूर – राज्याच्या गृह विभागातील पोलीस शिपाई भरती तातडीने करण्याबाबत विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली. या लक्षवेधीला उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन आकृतीबंधानुसार 23 हजार ६२८ पोलीस शिपाई पदे भरली जाणार असल्याची माहीती विधानपरिषदेत दिली.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

गृहविभागातील १९७६ पासून आकृतीबंधानुसार पदभरती केली जात होती. सध्या लोकसंखेनुसार किती अंतरावर पोलीस स्टेशन, कर्मचारी, युनिट असले पाहिजेत याबाबत नवीन आकृतीबंध तयार करण्यात आल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगीतले. नवीन भरण्यात येणाऱ्या पोलीस शिपाई पदासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या पूर्वी ८४०० उमेदवारांना प्रशिक्षण देण्याची क्षमता होती. त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

सायबर गुन्हासाठी डायनॉमिक प्लॅटफॉर्म
सायबरच्या वाढत्या गुन्हया संदर्भात आ सतेज पाटील यांनी मुद्दा उपस्थित केला. याला उत्तर देताना गृहमंत्री फडणवीस यांनी सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात जगातील सर्वात डायनॅमिक प्लॅटफार्म तयार केला जात आहे. १ हजार प्रशिक्षित कर्मचाऱ्याचा समावेश असलेला सायबर फोर्स निर्माण करणार असल्याची त्यांनी दिली.

कोरोना काळात भरती न झाल्याने अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपत आल्याने उमेदवार निराश झाले होते. याबाबत गृहविभागाशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. सीसीटीव्हीचे फुटेच कोणालाही उपलब्ध होत आहे. यामुळे एखाद्या व्यकीचे खाजगी आयुष्य धोक्यात येवू शकते याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले असता मंत्री फडणवीस यांनी हा मुद्दा रास्त आहे. याबाबत गृहविभागाशी चर्चा करून निकष करण्यासंदर्भात प्रयत्न करू असे सांगितले.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.