अनुदान 2100 रुपये करण्यासाठी प्रयत्न करू: निवेदिता माने

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान 2100 रुपये करण्यासाठी प्रयत्न करू माजी खासदार श्रीमती निवेदिता माने

शिरोली:(रुपेश आठवले)   :  हेरले तालुका हातकणंगले येथे संजय गांधी निराधार समितीच्या वतीने संकल्प सिद्धी गणपती मंदिर मध्ये संजय गांधी ,श्रावण बाळ, व इंदिरा गांधी वृद्धकाळ योजनेतील मंजूर झालेले हेरले येथील लाभार्थ्यांना मंजूर आदेश पत्र वाटपाचा कार्यक्रम जिल्ह्याच्या नेत्या माजी खासदार डॉक्टर श्रीमती निवेदिता माने यांच्या प्रमुख हस्ते तसेच भाजप युवा मोर्चेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविंद माने संजय गांधी समितीचे अध्यक्ष झाकीर हुसेन भालदार पत्रकार संघाचे माननीय अनिल उपाध्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

 श्रीमती निवेदिता माने यांनी खासदार धैर्यशील माने,आणि विद्यमान आमदार अशोकराव माने (बापू )यांच्या माध्यमातून संजय गांधी निराधार लाभार्थ्यांचे अनुदान 1500 रूपये वरून 2100 रुपये करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी  नामदार  देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदनचा ठराव करण्यात आला. सदर कार्यक्रमात शिवसेना शाखाप्रमुख  गवळी, सयाजी गायकवाड ,भाजप उपाध्यक्ष संदीप मुंडे ,इनामदार काका, अमोल मोहिते, यांच्यासह कार्यकर्ते व लाभार्थीत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.