कोल्हापूर जिल्ह्यात रिपब्लिकन पार्टीत नेतृत्वबदलाचे वारे!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) गटाला काेल्हापुरात नवी उर्जा मिळणार

जिल्हापरिषद पंचायत समिती होण्या अगोदरच कोल्हापुर जिल्ह्यात हालचालींना वेग

आठवले साहेबांकडून नवे नेतृत्व घडवण्याचे संकेत – कार्यकर्त्यांत उत्साह

रुपेश आठवले-

काेल्हापूरः: राज्यात आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका व नगरपरिषद निवडणुका होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) कोल्हापूरमध्ये मोठा नेतृत्वबदल घडवणार आहे.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मजबूत करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.   नागालँड मध्ये 2 आमदार निवडून आले. त्यानंतर रिपब्लिकन पक्षाने आता महाराष्ट्रातही संघटन बळकट करण्याचे संकेत दिले आहेत.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पक्षाचे राज्य संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील शिष्टमंडळाने ना. आठवले साहेबांची भेट घेतली. या भेटीत कोल्हापूरमध्ये नवीन नेतृत्वाला संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आठवले साहेबांनी “लोकशाहीला धरून तुमची मागणी रास्त आहे, लवकरच नवीन नेतृत्वाला संधी मिळेल,” असे आश्वासन दिले.

ही बातमी देखिल जास्त वाचली गेली… .तुम्ही ही वाचा.

ELECTION हेरले येथे दलित मित्र अशोकराव माने यांच्या महाजनादेश पद यात्रेचे अभूतपूर्व स्वागत

या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमार कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष जानबा कांबळे, दिपक भोसले, संजय जिरगे, ज्येष्ठ नेते किरन नामे, जिल्हा सचिव सतिश माळगे (दादा), रियाज सय्यद मिया, कुंडलीक कांबळे (राधानगरी), लक्ष्मण पारसे (होलार आघाडी), ज्येष्ठ नेते राजू भडंगे, प्रविण आजरेकर, बाळासाहेब कांबळे, गणेश भोसले, रोहित कांबळे, अभिजित कांबळे, जबीउल्ला सय्यद, सिकंदर शेख (पैलवान) यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.