पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
स्त्री धन म्हणजे.. मंगळसूत्र हाेय.. ते गळ्यात न पडले का नि काेणी चाेरले काय. तेही साेन्याचं म्हणजे मनाला लागणारीच गाेष्ट म्हणायची. बहुदा एकदा साेनं गेल, हरवले, या चाेरीस गेल तर पुन्हा मिळणे, या सापडणे म्हणजे महाकठीणच. पण चंदगड मध्ये जे घडले ते साऱ्यांचीच मनं जिंकणारे, विश्वासहर्ता जपणाराच प्रकार म्हणायच. चंदगड तालुक्यात माँर्निंग वाँकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील साेन्याचा दागिना परत मिळण्याची घटना घडलीय. ताे प्रामाणिकपणे दिल्याने, आजही समाजात विश्वासर्हता आहे. सत्याचा विजय हाेऊ शकताे. हेच या घटनेतून दिसून आल्याने, चंदगड मध्ये जपलेल्या प्रामाणिकपणाचे काैतुक हाेत आहे. खरतर या साेशल मिडीयाचा खूप माेठा फायदा झाला नि ताे अगदी याेग्य व सत्याच्या बाजूने झाला हे वैशिष्ट्य. याच घटनेतील दुसरी बाजू म्हणजे.. बक्षिस देण्याचा प्रयत्न हाेतानाही ताे नाकारला जाऊन,काही रक्कम समाजहितासाठी देऊ केल्याने सर्वांचाच यातून आत्मसन्मान वाढल्याचे पहायला मिळाले… चंदगड येथील नाैशाद मुल्ला यांनी जे समाजभान जपलंय. त्यांच्या या कार्यकतृत्वाला समाजानेही सलाम केलाय.
आजच वेळ घ्या… त्रासमुक्त व्हा
“मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील रस्त्यात पडलेला सोन्याचा दागिना प्रामाणिकपणे परत केल्याची घटना चंदगड येथे गुरुवारी २० राेजी घडली. चंदगड येथील अमृता अशोक दळवी या नेहमीप्रमाणे छत्रपती संभाजी चौक ते चंदगड फाटा मार्गावर भल्या पहाटे फिरायला गेल्या होत्या. घरी येऊन पाहतात तो मंगळसूत्र गळ्यात नाही. त्यांनी लागलीच घरात शोधा शोध सुरू केली पण शोध लागला नाही. काही वेळात त्यांच्या लक्षात आले की मॉर्निंग वॉकला जाताना मंगळसूत्र गळ्यात होते. घाई गडबडीत त्या पुन्हा आल्या पावली फिरायला गेलेल्या मार्गाने शोध घेण्यासाठी बाहेर पडल्या, पण त्यांना यश आले नाही. दरम्यान दीड तास निघून गेला होता. मंगळसूत्र सापडण्याची आशा मावळली होती. तरीही घरातील व शेजारी मंडळींच्या सुचनेवरून मंगळसूत्र हरवल्याची बातमी व्हाट्सअप ग्रुप वरून व्हायरल केली.
Loading ...
या सोशल मीडियाचा योग्य तो परिणाम झाला. सामाजिक कार्यकर्ते व चंदगड अर्बन बँकेचे मॅनेजर नौशाद मुल्ला यांनी आपण नमाजला गेलो असता आदम बेग यांना मंगळसूत्र सापडल्याची माहिती अशोक दळवी यांना दिली व त्यांच्याकडून ते घेण्यास सांगितले.मंगळसूत्र आणायला जातानाच अशोक दळवी यांनी बेग यांना देण्यासाठी सोबत दहा हजार रुपये घेतले. मंगळसूत्र परत केल्याच्या बदल्यात देऊ केले. पण प्रामाणिक बेग यांनी ते नम्रतापूर्वक नाकारले. शेवटी दळवी यांच्या आग्रहाखातर १० हजार पैकी समाजासाठी ३ हजार रुपये, एका लकवा पीडित रुग्णाला २ हजार रुपये तर ५ हजार रुपये रवळनाथ मंदिराला दान करण्यास सांगितले. हा प्रकार समजताच चंदगड शहरात आदम बेग यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यावेळी त्यांचा शरद हदगल यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.