“शेतकऱ्यांच्या गरजांना न्याय देणाऱ्या बाजार समित्यांची गरज”- सुभाष घुले

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

शिराेली: (रुपेश आठवले)
“शेतकरी हा बाजार समितीचा खरा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांनी शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून त्यांना उपयुक्त अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. उत्पन्नवाढीसाठी नव्या कल्पनांची अंमलबजावणी व्हावी. प्रत्येक बाजार समितीत ई-वाचनालय सुरू करावे, जेणेकरून शेतकरी व व्यापाऱ्यांना तंत्रज्ञान व ज्ञानाचा सहज लाभ मिळू शकेल,” असे स्पष्ट व प्रभावी  कोल्हापूर पणन विभागीय कार्यालयाचे उपसरव्यवस्थापक डाँ. सुभाष घुले यांनी व्यक्त केले.

कोल्हापुरात आयाेजित भव्य कार्यशाळेला भरघाेस प्रतिसाद मिळाला. :
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे आणि राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांसाठी एक दिवसीय पणन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा ‘हॉटेल द फर्न’ येथे उत्साहात पार पडली.

कार्यशाळेच्या प्रारंभी सर्व मान्यवरांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. यानंतर डॉ. घुले यांनी कार्यशाळेची प्रस्तावना मांडत राज्याच्या विविध पणन योजना, धोरणे आणि बाजार समितींच्या सक्षमीकरणावर सखोल मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत तुळशीदास रावराणे (सभापती, सिंधुदुर्ग), सुरेश सावंत (सभापती, रत्नागिरी), सुरेश पाटील (वडगाव पेठ), प्रकाश देसाई (कोल्हापूर), रामदास पाटील (गडहिंग्लज), अण्णा पानदारे (जयसिंगपूर) आदींसह कृषी उपसंचालक नामदेव परीट, तात्यासाहेब मुरुडकर (सहकारी अधिकारी), अच्चुत सुरवसे (डीएमआय), यतीन गुंडेकर, शेखर कोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

परीट यांनी बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील कृषी उत्पादनांचे नियमन याविषयी मार्गदर्शन केले. डीएमआयचे अधिकारी अच्चुत सुरवसे यांनी केंद्र शासनाच्या योजनांची माहिती देत शेतकरी व बाजार समिती यांच्यातील दुवा अधिक बळकट करण्याचा संदेश दिला. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी शेखर कोंडे यांनी उपस्थितांचे मन:पूर्वक आभार मानले.

सारांश :
बाजार समित्यांनी केवळ व्यवहाराचे नव्हे तर शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र व्हावे, ही या कार्यशाळेची खरी दिशा होती. शासनाच्या योजना, आधुनिक सुविधा व ज्ञानाच्या मदतीने शेतकरी सक्षम होईल, हाच या प्रयत्नांचा उद्देश होता.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.