|
महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत कोल्हापूर परिमंडलाचे ‘समोरच्या घरात’ द्वितीय कोल्हापूर- TEAM WATCH: महावितरणच्या ‘नाट्यबहार’ या आंतरप्रादेशिक राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत कोल्हापूर परिमंडलाच्या ‘समोरच्या घरात’ या नाटकाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, पद्मावती येथे २१ व २२ ऑक्टोबर रोजी झालेल्या या दोन दिवसीय स्पर्धेचा गुरुवारी सायंकाळी उत्साहात समारोप झाला. विविध सामाजिक विषयांवरील चार नाटकांच्या सादरीकरणातून महावितरणच्या कर्मचाऱ्यांमधील कलागुणांचा आविष्कार अनुभवायला मिळाला. बक्षीस वितरण समारंभाला महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार, कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे, कार्यकारी संचालक परेश भागवत व अंकुर कावळे, कार्यकारी संचालक तथा पुणे प्रादेशिक संचालक सुनील काकडे आणि नागपूर प्रादेशिक संचालक राजेश नाईक, समन्वयक तथा मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्यासह परीक्षक म्हणून राज काझी, अजय धनवे, शुभांगी पाठक व राज कुबेर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या नेतृत्वाखाली पुणे परिमंडलाने नाट्यस्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. प्रादेशिक संचालक म्हणून सुनील काकडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालनाची जबाबदारी सौ. मृदुला शिवदे व भक्ती जोशी यांनी सांभाळली. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भूपेंद्र वाघमारे यांनी आभार मानले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कोकण प्रादेशिक विभागाचे ‘ओल्या भिंती’ आणि पुणे प्रादेशिक विभागाचे ‘समोरच्या घरात’, तर दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगर विभागाचे ‘वारी’ आणि नागपूर प्रादेशिक विभागाचे ‘थलाई कुथल’ ही नाटके सादर झाली. या नाट्यप्रयोगांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा संपूर्ण निकाल पुढीलप्रमाणे :
|































































