पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीबाबत विशेष कक्ष…
कोल्हापूर – जिल्ह्यातील नागरिकांकडे कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीबाबतचे उपलब्ध असलेले 1967 पूर्वीचे पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी जुनी अभिलेखे स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात स्थापन केलेल्या विशेष कक्षात पहिल्या दिवशी जिल्ह्यातील एकूण 19 व्यक्तींनी त्यांचे कडील पुरावे दाखल केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी संजय तेली यांनी दिली.
आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
यामध्ये करवीर व गगनबावडा तालुका पाच, चंदगड व गडहिंग्लज शून्य, भुदरदरगड व आजरा दोन, पन्हाळा व शाहूवाडी सहा, राधानगरी व कागल पाच, हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील एक जणांचा समावेश आहे. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. |
| या समितीच्या कामकाजाच्या अनुषंगाने समितीचे अध्यक्ष व सदस्यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा नियोजित असून त्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे मंगळवार 28 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे. या समितीच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांकडे उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी जुनी अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात 24 नोव्हेंबर पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.
|

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.
Post Views: 383