शिवसेनेला शंभर टक्के रिजल्ट देणारा जिल्हा म्हणजे कोल्हापूर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

शिवसेनेचा गटप्रमुख मेळावा — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार… कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद मजबूत…

कोल्हापूर (विनायक जितकर) — शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर येथे आयोजित शिवसेनेचा गटप्रमुख मेळावा अत्यंत उत्साहात व ऐतिहासिक वातावरणात पार पडला. रामकृष्ण मंगल कार्यालय, मार्केट यार्ड येथे पार पडलेल्या या भव्य मेळाव्याला उद्योग मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, सर्व गटप्रमुख व हजारोंच्या संख्येने शिवसैनिकांनी उपस्थित राहून शिवसेनेच्या संघटनात्मक शक्तीचे भव्य दर्शन घडवले.

या मेळाव्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेची संघटनात्मक बांधणी, पक्षविस्तार, विकास उपक्रम आणि आगामी निवडणुकांची रणनीती यावर सविस्तर चर्चा झाली. संपूर्ण परिसर शिवसैनिकांच्या उपस्थितीने व उत्साहाने कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक शक्तीचा प्रभावी संदेश या मेळाव्याद्वारे देण्यात आला. यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने यांनी आपली मनोगत व्यक्त केली.

यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, आजचा मेळावा हा शिवसेनेच्या नवचैतन्याचा प्रारंभ आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिक संघटित झाला पाहिजे येणाऱ्या निवडणुकामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची सत्ता आणण्याचा संकल्प करूया आणि येणाऱ्या सर्व निवडणुकीत शिवसेना महायुतीचा झेंडा फडकावा हीच आमची भूमिका आहे. महाराष्ट्रासह शिवसेनेचे मजबूत संघटन कोल्हापूर जिल्ह्यात आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतुत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचा झाला याचप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचे काम शिवसेना नेते करतील व या माध्यमातून शिवसेनेचे संघटन मजबूत करण्याचे काम करू असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

या मेळाव्याला मार्गदर्शन करताना शिवसेना मुख्यनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “शिवसेना ही जनतेच्या हक्कासाठी लढणारी संघटना आहे. सत्ता हवी म्हणून नव्हे तर जनतेच्या कल्याणासाठी आपण राजकारण करतो. प्रत्येक गटप्रमुख हा पक्षाचा कणा आहे — त्याच्या मेहनतीतूनच आपली ताकद उभी राहिली आहे. कोल्हापूर जिल्हा हा शिवसेनेची ताकद व अभिमान आहे. आणि पुढील काळात येणाऱ्या निवडणुकांत शिवसेनेचा भगवा अधिक जोमाने फडकविण्याची जबाबदारी तुमची आहे,” शिवसेना हा पक्ष नसून एक कुटुंब आहे. शिवसेनेत सगळ्यात मोठे पद हे शिवसैनिक आहे. असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

या मेळाव्याचे आयोजन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संदीप मुगदूम यांनी केले तर आभार जिल्हा प्रमुख विजय बलुगडे यांनी मानले. या मेळाव्याला राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षिरसागर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार जयश्री जाधव, तसेच शहर प्रमुख सत्यजित  कदम, कोल्हापूर दक्षिण विधानसभा प्रमुख शारंगधर देशमुख, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, विजय बलुगडे, रवींद्र माने यांच्यासह शिवसेनेचे सर्व मान्यवर उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.