सायबर सुरक्षा ट्रेनिंगसाठी कोल्हापूरच्या कमला विद्यार्थिनी पुण्यात…क्विक हिल फौंडेशनचे मार्गदर्शन

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापूर/शिरोली (शीतल डोंगरे) :कोल्हापूरमधील कमला कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सायबर सुरक्षा क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले असून पुण्यातील नामांकित ‘क्विक हील फाउंडेशन’च्या विशेष प्रशिक्षण सत्रासाठी त्यांची निवड झाली आहे. १२ जून २०२५ रोजी पुण्यात झालेल्या या प्रशिक्षणात देशभरातून निवडक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग होता. कोल्हापूरसारख्या जिल्ह्यातून निवड होणे ही नक्कीच अभिमानास्पद बाब मानली जात आहे.

कमला कॉलेजच्या बीसीए विभागातील श्रुती ठोंबरे (प्रेसिडेंट), श्रुती पुरेकर (सेक्रेटरी), रुबीना मुजावर (अ‍ॅक्टिव्हिटी डायरेक्टर) आणि शितल डोंगरे (मीडिया डायरेक्टर) या विद्यार्थिनींनी सायबर सुरक्षा, सोशल मीडिया फ्रॉड, डिजिटल आयडेंटिटी संरक्षण, डेटा प्रायव्हसी यांसारख्या अत्याधुनिक विषयांवर सखोल प्रशिक्षण घेतले. या सत्रात तंत्रज्ञानाशी निगडित वास्तवातील समस्या, महिलांच्या ऑनलाइन सुरक्षेची आवश्यकता आणि भविष्यातील सायबर धोके यावर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन झाले.

कार्यक्रमात प्रा. अजय शिर्के, अनुपमा काटकर, दिपू सिंग, गायत्री, बतुल यांसारख्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर यांनी विद्यार्थिनींच्या आत्मविश्वासाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कमला कॉलेजच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी बी. मुडेकर व विभाग प्रमुख प्रा. रोहिणी लोकरे यांनी विद्यार्थिनींना वेळोवेळी प्रोत्साहन दिले. “शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थिनींमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता वाढवणे ही काळाची गरज आहे आणि आमच्या विद्यार्थिनींची निवड ही त्या दिशेने उचललेलं ठोस पाऊल आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. याशिवाय शिक्षक समन्वयक तथा सहाय्यक प्राध्यापक निलेश लक्ष्मण क्षीरसागर यांनी विद्यार्थिनींना तयारीपासून निवड होईपर्यंत सतत मार्गदर्शन केले.

या उपक्रमाचा विशेष भाग म्हणजे निवड झालेल्या विद्यार्थिनी आता कोल्हापूर आणि परिसरात सायबर जनजागृती उपक्रम राबवणार आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणींमध्ये डिजिटल साक्षरता आणि सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण होणार आहे. विद्यार्थिनींचा हा पुढाकार केवळ स्वतःपुरता मर्यादित नसून समाजहितासाठी एक सकारात्मक पाऊल ठरत आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.