इतिहासाच्या रेषा आता धावू लागल्या….‘भारत गौरव’ ट्रेन कोल्हापुरात –

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

 

काेल्हापूर| अनिकेत बिराडे :
आज पहाटे कोल्हापूर रेल्वे स्थानकावर काहीतरी खास घडलं…शिवगौरवाच्या ओलावलेल्या आठवणी घेऊन ‘भारत गौरव पर्यटन ट्रेन’ कोल्हापूरात आली, आणि क्षणभर इतिहासाचा काळदेखील थबकून उभा राहिला!

“छत्रपती शिवाजी महाराज सर्किट टूर” अंतर्गत या अनोख्या प्रवासाने पर्यटकांना केवळ स्थळं दाखवली नाहीत, तर शिवचरित्राची जीवंत अनुभूती दिली. ९ जून, शिवराज्याभिषेक दिनी मुंबईहून सुरू झालेला हा ऐतिहासिक प्रवास आज कोल्हापूरात पोहोचला, आणि अंबाबाईच्या दर्शनाने प्रत्येक पर्यटकाचा मनोमनो नवा उत्सव झाला. यावेळी काेल्हापूरकरकरांनीही आलेल्या पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देत, काेल्हापुरी पाहुणचारही दिला. 


पन्हाळ्याच्या साक्षीने – शौर्य पुन्हा जागं …

कोल्हापूरात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या ओठांवर फक्त अंबाबाईचं नाव नव्हतं, तर पन्हाळ्याच्या गडकोटाविषयी अनामिक ओढ होती. “इथे महाराज होते, हेच ते ठिकाण!” – हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याची आस होती.आज हे स्वप्न साकार झालं. त्यामुळे रेल्वेतील पाहुण्या प्रवाशांनी रेल्वेच्या या उपक्रमाचे भरभरून काैतुक केले. यातूनची काेल्हापूरसह आपल्या महाराष्ट्राचा इतिहास, गाैरवगाथा सर्वदूर पाेहचतील असा विश्वास दाखविला. 


ही केवळ ट्रेन नाही… ही आहे स्वाभिमानाची रेखा!

रेल्वे मंत्रालयाच्या IRCTC व महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने मिळून सुरू केलेल्या या सहलीत, ७०० पर्यटकांनी रायगड, शिवनेरी, लाल महाल, भीमाशंकर, प्रतापगड अशी शिवशौर्याने भारलेली ठिकाणं अनुभवली आहेत. कोल्हापूरच्या भूमीत प्रवेश करताच त्यांना मिळाले शासनाचं आणि जनतेचं प्रेमळ स्वागत. या सहलीत जेवण, राहण्याची व्यवस्था, बस, विमा संरक्षण यांची संपूर्ण योजना आखण्यात आली आहे.पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे, ही संपूर्ण यात्रा जणू इतिहासाचा एक धावता सजीव दस्तावेज आहे अशीच प्रतिक्रीया रेल्वेतील पाहुण्या प्रवाशीवर्गाने दिलीय. 


कोल्हापूरच्या अभिमानासाठी हा एक सुवर्ण क्षण!

शिवरायांचा इतिहास, कोल्हापूरचं अध्यात्म, आणि पर्यटनाची सृजनशीलता यांचा त्रिवेणी संगम आज कोल्हापुरात घडला.
Positive Vachच्या दृष्टीने ही बातमी केवळ घटनांची नोंद नव्हे, तर भावनांची लहर आहे.
शिवरायांचे पदस्पर्श लाभलेल्या भूमीत ही ट्रेन येणं म्हणजे गौरव, प्रेरणा आणि नवी दिशा…


पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.