पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
 |
|
काेल्हापूरः धक्कादायक, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याच नावाने आता बनावट फेसबुक खाते उघडल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. त्यामुळे पालकमंत्री मुश्रीफ यांनी याची गांभिर्याने दखल घेत, तत्काळ या संदर्भात कागल पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. कागल पाेलि्सांनी देखिल या घटनेची नाेंद घेत, गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी कंबर कसली आहे . सायबर विभागाच्या वतीने देखील या घटनेचा विशेष शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
 |
 |
मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते अज्ञात व्यक्तीने उघडले असल्याचे निदर्शनास आले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे काही फोटो व इतर मजकूर तसेच अन्य व्हिडिओ आणि व्हिडिओची कॉपी या बनावट फेसबूक अकाऊंटच्या फेसबुक पेजवर अपलाेड केल्याचे दिसून आले. त्यामुळे या फेसबुक अकाऊंटचा शाेध घेण्याचा प्रयत्न सर्व ठिकाणावरून केला जात असून, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडूनही ह्या घटनेची गांभीर्याने दखल घेत ,तत्काळ पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. कागल पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायदा 2000 अंतर्गत कलम 66 व कलम 43 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संशयिंताना लवकरच पकडण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास कागल पोलिसांनी व्यक्त केला आहे. आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

|
 |
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.
Post Views: 602