कोल्हापूर जिल्हयातील कचरावेचकांच्या विकासासाठी अवनि संस्थेचा प्रयत्न सुरू आहे. कचरावेचकांच्या मुलांचा शैक्षणिक विकास तसेच आरोग्य सुविधा शिवाय सामाजिक सुरक्षा योजना कचरावेचकांसाठी अवनि संस्थेमार्फत केले जाते. जिल्ह्यातील कचरावेचक महिला 25 टक्के कचरा वर्गीकरण काम करतात व पर्यावरणाला हातभार लावतात. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रश्न गंभीर बनला आहे. प्रत्येक घरातून मिळणारा कचरा हा वर्गीकरण न करता दिला गेला असल्याने इपिंग ग्राऊंडवर डोंगर बनले आहेत. 8 एप्रिल 2016 ला घन कचरा व्यवस्थापन कायदा अस्तित्वात आला असून त्यानुसार कचरा वर्गीकरणाची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची असून ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती तसेच सुक्या कचऱ्याचा वापर पुर्नवापरासाठी (आवश्यकतेनुसार) करणे अभिप्रेत आहे. ह्या कायदयानुसार जिल्ह्यामध्ये कचरावेचकांचा संबंधित विभागाने सर्व्हे करून कचरा वर्गीकरणाच्या कामात लगेच घरगुती कचरा संकलनाच्या कामात कचरावेचकांना समाविष्ट करून घेणे बंधनकारक आहे. सध्या यावर वारंवार निवेदन पत्रव्यवहार करून मुद्धा आजतागायत मागण्या मान्य झाल्या नाही. कचरावेचकांचे पिढयान पिढी उदरनिर्वाहचे साधन म्हणून कचरा वर्गीकरणाचे काम करतात. या निवेदनाद्वारे आपणास विनंती करतो कि आपण जिल्ह्यातील 8 एप्रिल 2016 चा धन कचरा व्यवस्थापन कायदयाची अमलबाजावणी काटेकोर पणे करून कचरा वर्गिकरण वैज्ञानिक पद्धतीने केले जावे. सदर ५ जून पर्यावरण दिनानिमित्य मागणीचे निवेदन कनिष्ठ लिपिक उमेश शिंदे , प्रदुषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर यांना देण्यात आले. या निवेदनावेळी कचरावेचक संगिता लाखे, राजश्री नाईक,बनाबाई कांबळे, मंगल कांबळे व कार्यकर्ते स्नेहल जाधव, सविता कांबळे, जैनुद्दीन पन्हाळकर उपस्थित होते. ५ जून पर्यावरण दिनानिमित्त कचरावेचक (भंगारवेचक) महिलांच्या मागण्या पुढीलप्रमाणे- ब्लू लिंक क्लिक करा व्हीडीओ पहा https://youtu.be/FuQaohTasGQ?si=hKf3421oNVX8XSZU |