मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की…

काेणावरही अन्याय करणार नाही. सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. ती सरकारची जबाबदारी आहे. अन्य काेणत्याही समाजावर अन्याय हाेणार नाही. सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. यासंबंधी युद्धपातळीवर काम सुरु आहे. हे आरक्षण कामय स्वरूपी टिकणारे, कायद्याच्या चाैकटीत बसणारे हे आरक्षण असेल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काेल्हापूर येथे दिले.

उस प्रश्नाविषयी एकनाथ शिंदे म्हणाले की.. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी सरकार घेईल. सर्व नियम बाजून ठेवून सरकारने शेतकर्ऱ्यांना मदत केली आहे. पिकविमा योजना दिलीय, केंद्र सराकरही मदत करत आहे. आपले सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. त्यामुळे उसाच्या बाबतीत देखिल केंद्र सरकारचे जे धोरण आहे, ते धोरण आणि कारखान्यांचे प्राँफीट धोरण याचा सर्व विचार करून शेतकऱ्यांच्या पाठीशी राहू, शेतकऱ्यांना वाऱ्यावर साेडणार नाही. जिल्हाधिकारी स्तरावर एक समिती नेमली असून, शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमाेर ठेवून सरकार काम करील अशीही ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

कोल्हापूर: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिराला भेट देवून सहकुटुंब दर्शन घेतले. तत्पुर्वी कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांचे स्वागत कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबीटकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले. श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर परिसरात मुख्यमंत्री महोदयांनी भेट देवून उपस्थित भाविकांना नमस्कार केला. तसेच मंदिरात विधिवत पूजा करून मुख्यमंत्री महोदयांनी सपत्नीक देवीला ओटी अर्पण केली. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यामध्ये सर्वांच्या घरामधे सुखसमृद्धी लाभावी अशी मागणी देवीकडे केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.