MH 51 हा नंबर देखील आता तुम्हाला कोल्हापूरची ओळख देणार आहे.
इचलकरंजी – इचलकरंजीसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात यापुढे फक्त MH 09 नाही तर MH 51 पासिंग क्रमांकाच्या गाड्या देखील दिसतील.
या पुढे तुम्ही एखाद्या रस्त्यावरून जात असाल आणि तुम्हाला अचानक MH 51 पासिंगची गाडी दिसली तर ही कोणत्या शहराच पासिंग आहे या विचारात तुम्ही पडला तर त्या आधीच आम्ही तुम्हाला याचे उत्तर सांगतो. तुम्ही कोल्हापूर जिल्ह्याला MH 09 या आरटीओ पासिंगने देखील ओळखता, मात्र MH 51 हा नंबर देखील आता तुम्हाला कोल्हापूरची ओळख देणार आहे. कारण MH 51 हा कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहराला नव्याने ओळख मिळाली आहे. इचलकरंजी शहराला महानगरपालिकेचा दर्जा मिळाल्यानंतर आता इचलकरंजीसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे इचलकरंजीला MH 51 या नोंदणी क्रमांकसह नवीन कार्यालय मिळाला आहे.