काेल्हापूरची पंचगंगा धोका पातळीच्या उंबरठ्यावर
काेल्हापूरः काेल्हापूर जिल्ह्यात व विशेषतः धरणपरिसरात पावसाची मुसळधारा सुरुच असून, सलग पडणाऱ्या पावसामुळे बुधावारी रात्री ८ च्या सुमारास राधानगरी धरण ९४ टक्के भरले असून, पंचगंगा नदीने धाेक्याची पातळी ओलांडली असून, काेल्हापूर शहरवासियांच्या उंबरठ्यावर पूराची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी बुधवारी रात्री इशारा पातळीवर म्हणजेच ३९ फुटावर असून, धाेका पातळी ही ४३ फुटआहे.
जिल्ह्यातील एकूण ८१ बंधारे पाण्याखाली असून, राधानगरी धरण देखिल गुरुवार सकाळपर्यंत पूर्ण क्षमतेने भरलेले असेल असा अंदाज पाटबंधारे विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. बुधवारी रात्री राधानगरी धरणातून ६२३१३ क्युसेस पाणी साेडण्यात आले आहे. तर दुसऱ्या बाजूला सतत सुरु असलेल्या मुसळधारामुळे शहर परिसरातील सखल परिसरात रस्त्याकडील गटार तुंबल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलेले दिसत हाेते. तर रस्त्यावरून जातान रस्ता कमी खड्डेच जास्त दिसत असल्याने महापालिका प्रशासनविराेधात वाहनचालक तसेच रहिवाशांमधून तीव्र नाराजी व संताप व्यक्त करण्यात येत हाेता.
बुधवारी देखिल काेल्हापूर जिल्हयात पावसाची जाेरदार बँटींग राहिल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे सध्या पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडून धोका पातळीच्या उंबरठ्यावर असल्याचं दिसून येतंय . दुसऱ्या बाजूला पूराची शक्यता जाणून. जिल्हा व महापालिका प्रशासन सज्ज झाले असून, संभाव्य पूरस्थिती जाणून नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात येत आहे. नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था देखिल सज्ज ठेवण्यात आली आहे. दरम्यान कोकणला जोडणारा कोल्हापूर रत्नागिरी हा महामार्ग केर्ली जवळ बंद करण्यात आला आहे, पर्यायी मार्गाने या मार्गावरील वाहतूक सुरू आहे.दुसरीकडे कसबा बावडा सीए मार्गावर देखील पाणी आल्याने हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे.
पंचगंगा नदीवर पाणी आल्यास काेल्हापूर पूणे मार्गावरील वाहतूकीवर देखिल परिणाम हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाचा असाच मुसळधारा मारा सुरु राहिल्यास, गुरुवारी सायंकाळपर्यंत पूराचा धाेका नाकारता येत नाही. काेल्हापूर रत्नागिरी मार्गावर जुळेवाडी येथे एक कंटेनर अडकल्याने काही तास वाहतूक खाेळंबली हाेती. शहरातील मार्केटयार्ड येथे एक सहकार संघाची दगडी भिंत काेसळून यात इमारत व खतांचे सुमारे ५२ लाखांचे नुकसान झाले. शिराेळ येथेही श्री दत्त मंदिर पाण्याखाली असून, कृष्णा नदीची पाण्याची पातळी वाढल्यास नागरी वस्ती पाणी शिरण्याची शक्यता आहे. पाऊस न थांबल्यास पूराच्या धाेक्यामुळे नागरिकांसह प्रशासन देखिल सावध झाले असून, सुरक्षेतेसाठी गुरुवारपासूनच प्रशासन व नागरिकांनी काळजी घेण्यास सुरुवात केली आहे.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.