कोल्हापुरच्या आईच्या पोटी जन्म घ्यायचे भाग्य मला मिळाले – शरद पवार

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापूरच्या सभेतून शरद पवार यांचा जनतेशी संवाद…

कोल्हापूर – कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी चांद्रयान-3, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि महागाईसह विविध मुद्दे उपस्थित करत केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. शरद पवार म्हणाले की, ज्या राजाने दिलेली सत्ता ही सामान्यांसाठी वापरायची असते याचा आदर्श आपल्यासमोर घालून दिला. दोन राजे आपल्या अंतकरणात अखंड आहे. एका राजाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज असे राजे होऊन गेले त्यांनी राज्य उभे केले. पण ते राज्य कुटुंबाचे नव्हते. देशात अनेक राजे झाले. पण छत्रपतींचे राज्य भोसल्यांचे राज्य नव्हते. तर रयतेचे राज्य होते. शिवाजी महाराजांनंतर शाहू राजे या देशात होऊन गेले ज्यांनी आपली सत्ता सामान्य माणसांसाठी वापरली.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, एक व्यक्तीगत गोष्ट सांगतो, माझी आई कोल्हापूरची होती. मला जन्म दिलेली माता कोल्हापुरची होती. कोल्हापुरच्या आईच्या पोटी जन्म घ्यायचे भाग्य मला मिळाले. आजची बैठक, सभेत एका गोष्टीचा आनंद आहे. काल एक अतिशय मोठी गोष्ट केले. सगळे जग बघत होते. चंद्रयान 3 हे चंद्रावर उतरले. एक ऐतिहासिक काम या देशाच्या तज्ज्ञांनी केले. इस्त्रोच्या संघटनेने हे काम केले. या इस्त्रोच्या संघटनेला स्थापन करण्याची भूमिका जवाहरलाल नेहरु यांनी घेतली होती. सर्वपक्षीय पंतप्रधनांच्या प्रयत्नांनी इस्त्रोला यश मिळालं आहे.

शरद पवार म्हणाले की, सत्तेचा वापर हा विरोधकांना नामोहराम करण्यासाठी सुरू आहे. कोल्हापूरमध्ये एका नेत्याच्या घरी ईडी, आयकर विभागाने धाडी मारल्या. त्या घरातील भगिनींनी आम्हाला हवे तर गोळ्या मारा पण असा छळ नको असे बोलण्याचे धाडस दाखवले. मात्र, त्या घरच्या नेत्यांना हे धाडस दाखवता आले नाही आणि ते भाजपच्या बाजूला जाऊन बसले अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांना नाव न घेता टोला लगावला. कोल्हापूर ही शुरांची भूमी आहे. काही दिवसांपूर्वी काहींना ईडीची नोटीस आली. पण मला वाटलं ते ईडीला सामोरे जातील. पण भाजपसोबत सत्तेत बसले असल्याचे पवार यांनी सांगितले. यावेळी जयंत पाटील, अनिल देशमुख, रोहित पवार, शशिकांत शिंदे, फौजीया खान, रोहित आर आर पाटील यांच्यासह इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.