महापारेषणचा रसिकांना झटका… कलागुणांच्या अजब सादरीकरणातून मिळविला बक्षिसांचा खजिना!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कराड- महापारेषण राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा – वाशी परिमंडलच्या भू – भू या नाटकाने पटकविला प्रथम क्रमांक तर मंगेश कुलकर्णी उत्कृष्ट अभिनय आणि हर्षदा वाघमारे उत्कृष्ट अभिनेत्री

कराड – महापारेषण कराड परिमंडल आयोजित आंतर परिमंडलीय नाट्य स्पर्धा ‘‘कलाविष्कार’’ या स्पर्धेतवाशी परिमंडलच्या भू – भू या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक द आऊट बर्स्ट सांघिक कार्यालय मुंबई यांच्या या नाटकाने पटकावला तर वाशी परिमंडलाचे मंगेश कुलकर्णी उत्कृष्ट अभिनय आणि हर्षदा वाघमारे उत्कृष्ट अभिनेत्री यांना गौरवण्यात आले.

सातारा जिल्ह्यातील कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन (टाऊन हॉल ) महापारेषण कंपनीतील राज्यभरातील कर्मचारी व अधिकारी वर्गाने या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत जी आठ नाटक विविध परिमंडलांमार्फत सादर केली ती अतिशय उत्कृष्ट होती. वेगवेगळे विषय समाजापुढे मांडणारी होती. त्यामुळे या सर्वच नाटकातील कलाकारांचे मी अभिनंदन करतो. तसेच ज्यांना पारितोषक मिळाले त्यांनी याहीपेक्षा सुंदर काम करण्यासाठी कायम प्रयत्न ठेवा तर ज्यांना पारितोषिक नाही मिळाले त्यांनी याहीपेक्षा जोरदार तयारी पुढील स्पर्धेसाठी करावं असे मनोगत दिनेश वाघमारे यांनी केले.

कराड येथे आयोजित करण्यात आलेल्या या नाट्य स्पर्धेसाठी राज्यभरातील आठ परिमंडलातून महापारेषणचे कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले होते.

जिंकून दाखविल… आम्ही. बेस्ट टीम

 

या स्पर्धेतील विजेते आणि  बक्षीस अशी

उत्तेजनार्थ…..
स्पर्श- योगिनी कुलकर्णी
भू भू- नुरी पाल
तीस तेरा- चेतन तांबोळी
लाली- प्रताप भोसले
जननी जन्मभूमी- सुशील काळे
वैशाली कॉटेज- अरुंधती जगताप
दिपज्योती- शशिकांत इंगळे
द आऊट बर्स्ट – सुशील घाटगे

बालकलाकार
1 रुद्राक्ष खैरे- CO मुंबई
2 भार्गव जोशी -CO मुंबई
3 शर्वरी – नागपूर

रंगभूषा/वेशभूषा….
1- जननी जन्मभूमी
2 – तीस तेरा

संगीत…
1-द आऊट बर्स्ट
2 – भू भू

प्रकाश योजना..
1- द आऊट बर्स्ट
2 – स्पर्श

नेपथ्य…
1 – दिपज्योती
2 – स्पर्श

अभिनय (पुरुष)…
1 – भू भू – मंगेश कुलकर्णी
2 – द आऊट बर्स्ट – मधुर बोरकर

अभिनय (स्त्री)…
1 – भू भू – हर्षदा वाघमारे
2 – वैशाली कॉटेज – स्नेहल दरवडे.

दिग्दर्शक…
1- वाशी – भू भू
2- CO मुंबई – द आऊट बर्स्ट

निर्मिती/नाटक..
1 – भू भू – वाशी
2 – – द आऊट बर्स्ट CO मुंबई

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ दिनेश वाघमारे (भा.प्र.से), अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महापारेषण यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अनिल कोलप, संचालक (संचलन) महापारेषण मुंबई, श्रीकांत जलतारे, कार्यकारी संचालक . जयंत विखे मुख्य अभियंता अमरावती, सौ शिल्पा कुंभार ,मुख्य अभियंता कराड सतिश आणे, ,मुख्य अभियंता नागपूर मुंबई ,रंगनाथ चव्हाण (प्रभारी) मुख्यअभियंता औरंगाबाद , भूषण बल्लाळ, मुख्य अभियंता स्थापत्य संघिक कार्यालयसुधीर वानखेडे मुख्य महाव्यवस्थापक (मास ) मुंबई , भरत पाटील, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, महापारेषण मुंबई चिदाप्पा कोळी अधिक्षक अभियंता तथा नाटय सचिव कराड आदी मान्यवर मंचावर उपस्थीत होते.

‘स्पर्श’ ने जिंकली रसिकांची मने…महापारेषणचा काय आहे, स्पर्श जाणून घ्या

तर या स्पर्धेच्या वेळी पर्यवेक्षक म्हणून मुकुंद पटवर्धन सांगली माधुरी दातार पुणेनरेंद्र आमले पुणे यांनी काम पाहिलं. तर या कार्यक्रमाचे आयोजन सौ. शिल्पा कुंभार, मुख्य अभियंता कराड परिमंडल यांच्या मार्गदर्शनाखाली चिदाप्पा कोळी, अधीक्षक अभियंता, प्रांजल कांबळे, अधीक्षक अभियंता, अतुल मणूरकर, अधीक्षक अभियंता स्थापत्य अभिजीत धमाले, अधीक्षक अभियंता, (प्रभारी), राजेश केळवकर, सहा. महाव्यवस्थापक (विवले) व राजू कोळी, सहा. महाव्यवस्थापक (मासं) (प्रभारी) यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पाटील व सदानंद गौड यांनी केले

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.