शिवशक्ती प्रतिष्ठान कडून दिवाळी निमित्त गडकिल्ले प्रतिकृती उभारणाऱ्या १३ मंडळाचा सन्मान…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

भारतातील गड किल्ले “फोटो प्रदर्शन उदघाटन आणि दुर्गप्रेमी बळवंत सांगळे सर यांचा “शिवशक्ती सन्मान” देऊन गौरव…

कोल्हापूर – कोल्हापुरातील शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दुर्गप्रेमी बळवंत सांगळे यांनी कॅमेराबद्ध केलेल्या “भारतातील गड किल्ले” फोटो प्रदर्शनाचा उदघाटन व सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्या हस्ते “भारतातील गडकिल्ले” या गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्या हस्ते दुर्ग भ्रमंतीकार श्रीयुत बळवंत सांगळे यांना शिवशक्ती प्रतिष्ठानच्यावतीने “शिवशक्ती सन्मान” देऊन गौरवण्यात आले. यावेळी मान्यवरांना ऐतिहासिक पुस्तक, मावळी पगडी आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच बळवंत सांगळे यांनी त्यांच्या इतक्या वर्षाच्या भटकंतीचे अनुभव सर्वांसमोर मनोगताच्या रूपाने मांडले. यानंतर प्रतिष्ठानच्या वतीने कोल्हापूर शहरातील गेली दहा वर्षे झाली.

दिवाळी सणाच्या निमित्ताने गड किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारणाऱ्या १३ मंडळांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. हे प्रदर्शन २० नोव्हेंबर ते शनिवार २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत कोल्हापूरकरांसाठी शाहू स्मारक भवन येथे विनाशुल्क खुले राहणार आहे .तरी सर्वांनी आवर्जून या प्रदर्शनास भेट द्यावी. असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष – साताप्पा कडव यांनी केले आहे.

यावेळी उपाध्यक्ष – योगेश रोकडे, सचिव – अमोल पोवार, प्रतीक जगताप, पंडित कंदले, निलेश पिसाळ, प्रफुल्ल भालेकर, प्रवीण कुरणे, श्रेयस कुरणे, मनीष बडदारे, प्रशांत जाधव, अवधूत कणसे, प्रशांत पाटील, बजरंग गावडे, सुशांत शिंदे, नंदू कदम, कैलास दुधनकर, राजकीरण सावडकर, निलेश पवार, सुजय भोसले, स्वप्निल खाडे, रुपेश जाधव, संदीप पाडळकर, विजय कातले, श्रीधर बावडेकर, कुलदीप यादव, सुधीर जितकर, शिरीष जाधव, सागर साळुंखे, सुमित वैद्य, सागर बोडेकर, अरुण सावंत आदी सदस्यांसह कोल्हापुरातील दुर्गप्रेमी, सह्याद्री प्रेमी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.