‘गोकुळ’ च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे ४० दिवसात दूध विक्रीत सुमारे एक ते दीड लाख लिटरची वाढ

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या दर्जेदार दूध व दुग्धजन्य पदार्थांना ग्राहकांकडून दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून, त्याचा सकारात्मक परिणाम दूध विक्रीवर होत आहे. सध्या गोकुळकडून पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सांगली तसेच कोकण विभागात दररोज सुमारे १६ ते १६.५० लाख लिटर दूध विक्री होत आहे. गेल्या सुमारे ४० दिवसांत दैनिक दूध विक्रीत सुमारे एक ते दीड लाख लिटरची वाढ झाली असून, ग्राहकांचा वाढता विश्वास हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे दिसून येत आहे.

गुणवत्ता म्हणजेच गोकुळ, अशी ओळख ग्राहकांच्या मनात निर्माण झाली आहे. दूध संकलनापासून प्रक्रिया, पॅकिंग आणि ग्राहकांपर्यंत वितरणाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता व शुद्धतेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. त्यामुळे गोकुळचे दूध तसेच तूप, लोणी, पनीर, दही, ताक, श्रीखंड, चीज, बासुंदी, गुलाबजाम, आईस्क्रीम आदी दुग्धजन्य पदार्थांना बाजारपेठेत सातत्याने चांगली मागणी आहे.

गोकुळचे मार्केटिंग विभागाचे व्यवस्थापक हणमंत पाटील म्हणाले, “गुणवत्ता हीच गोकुळची सर्वात मोठी ताकद आहे. ग्राहकांना शुद्ध, सुरक्षित आणि दर्जेदार दूध व दुग्धजन्य उत्पादने योग्य दरात उपलब्ध करून देण्यावर आमचा कायम भर असतो. दूध उत्पादकांनी विश्वासाने पुरविलेल्या दर्जेदार दुधावर अत्याधुनिक पद्धतीने प्रक्रिया करून त्याची गुणवत्ता व शुद्धता कायम ठेवत सातत्यपूर्ण सेवेद्वारे ते ग्राहकांपर्यंत पोहोचविले जाते. त्यामुळे ग्राहकांचा गोकुळवरील विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. याच विश्वासामुळे गोकुळच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी सातत्याने वाढत असून, भविष्यातही गुणवत्तेत कोणतीही तडजोड न करता ग्राहकांना सर्वोत्तम उत्पादने देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

दूध उत्पादकांचा विश्वास, कर्मचारी, वितरक, केंद्र चालक, वाहतूकदार व हितचिंतक यांचे मोलाचे सहकार्य आणि ग्राहकांची पसंती यामुळे गोकुळच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. गुणवत्ता हीच खरी ओळख जपत अधिकाधिक ग्राहकांपर्यंत गोकुळची उत्पादने पोहोचविण्याचे काम पुढेही अधिक वेगाने सुरू राहणार आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.