Good news – विश्वविक्रम… कोल्हापूरच्या श्रीवर्धनने केले जगभर नावलौकिक! काय आहे वाचा सविस्तर…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

७५ मीटर हातावर आणि कंबरेला ७५ दिवे बांधून चालण्याचा विश्वविक्रम…

कोल्हापूर : शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूल, मुक्त सैनिक वसाहत, कोल्हापूर. श्रीवर्धन बनसोडे १० वी याचे “एशिया पॅसिफिक बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड स्वातंत्राचा ७५ वी पुर्ती अमृत महोत्सव निमित्य विश्वविक्रम २६ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ७.०० केला. त्यासाठी तज्ञ मार्गदर्शक परीक्षक डॉ महेश कदम सर यांनी काम पाहिले.

श्रीवर्धन लहानपणापासून हातावर चालत असे त्याचा हा छंद वाढत गेला व त्याला शाळेने व घरातून प्रोत्साहन मिळाले. आज त्याचा ७५ मीटर हातावर आणि कंबरेला ७५ दिवे बांधून चालण्याचा विश्वविक्रम बनला. हा विश्वविक्रम २२८ देशांमध्ये संस्था व शाळेच्या नावासह पोहचला. या शाळेने व मुलांनी नेहमीच वेगवेगळे विक्रम केले आहेत. त्यात या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त आणखी एक भर पडली ती श्रीवर्धन बनसोडेची.

अखेर विश्वविक्रम घडला… शाब्बास श्रीवर्धन, कोल्हापूरच नाव गेलं सतासमुद्रपार… करून दाखवले. लख्ख प्रकाशात नाव उजळून निघालं. कोल्हापूर आणि कोल्हापूरची पोरं आहेतच हुशार नि जगात भारी! हो कोल्हापूर मधील ही शाळा आहे, नेहमीच वेगळे कला गुण दाखविणारी आणि मुलाच्या कला गुण कौशल्य व क्रीडा प्रकाराला चालना देणारी, सर्वाना हवीहवीशी वाटणारी व नावलौकिक आलेख उंचावणारी ही शाळा आहे.

याप्रसंगी शाळेच्या मुख्याधापिका वृषाली कुलकर्णी मॅडम, क्रीडाशिक्षक राष्ट्रीय प्रशिक्षक क्रीडाशिक्षक राजेंद्र बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच आंतरभारती शिक्षण मंडळाचे सचिव, एम. एस. पाटोळे, उपाध्यक्ष जिनरत्न रोटे, शालेय समिती चेअरमन संजीवभाई परीख, संस्था शिक्षक प्रतिनिधी संतोष पोवार सर, नगरसेवक सत्यजित नाना कदम, राजसिह शेळके, डॉ प्रवीण कोडोलीकर विश्वविक्रमी नृत्यदिगदर्शक सागर बगाडे, विजय टिपुगडे, डॉ. महेश कदम (परीक्षक) एशिया पॅसिफिक बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड २०२४ तसेच तिन्ही शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर हे मान्यवर उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.