ग्रामीण भागातील ग्राहकांनाही आता आस्वाद घेता येईल..-ऋतुराज पाटील

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

गोकुळच्‍या शॅापीच्‍या उद्‌घाटन करते वेळी आमदार ऋतुराज पाटील, गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरूण डोंगळे, शॉपीचे मालक रामगोंडा पाटील व दादा पाटील, गोकुळचे मार्केटिंग विभागाचे अधिकारी लक्ष्मण धनवडे आदी मान्यवर दिसत आहेत.

गोकुळ शॉपिंच्या माध्यमातून गोकुळच्या उत्‍पादनांचा प्रसार वाढेल
अस्‍वाद ग्रामीण भागातील ग्राहकांना ही घेता येईल-आमदार ऋतुराज पाटील

गोकुळ शॉपी चे सांगवडे येथे उद्‌घाटन सोहळा 

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्‍या वतीने सांगवडे (ता.करवीर,जि.कोल्हापूर) येथे दसऱ्याच्या मुहूर्तावर गोकुळ शॉपीचे उद्घाटन आमदार ऋतुराज संजय पाटील यांचे हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे,संचालक बाबासाहेब चौगले व शॉपी धारक रामगोंडा पाटील, दादा पाटील तसेंच ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार ऋतुराज पाटील म्हणाले कि, गोकुळने नेहमीच उत्पादकांच्या बरोबरीने ग्राहकांचे ही हित जोपासले असून . ग्राहकांना दर्जेदार दूध व दुग्धजन्य पदार्थ गोकुळ शॉपिंच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत.दिवसेंदिवस गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थांना ग्रामीण व शहरी भागातून मोठया प्रमाणात मागणी असून गोकुळ शॉपिंच्या माध्यमातून गोकुळच्या उत्‍पादनांचा अस्‍वाद ग्रामीण भागातील ग्राहकांना ही घेता येईल,

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि गुणवत्ता आणि नैसर्गिक चव असणारे गोकुळ दूध, श्रीखंड, आंबाश्रीखंड, तूप, पनीर, बटर, दही, ताक, लस्सी, दूध पावडर, बासुंदी, फ्लेवर्ड मिल्क व्हॅनिला,पिस्ता,चॉकलेट व स्ट्रॉबेरी तसेच टेट्रा पॅकिंगमध्ये व्हॅनिला व मँगो लस्सी, मसाला ताक इत्यादी दूग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध ठेवले जाणार आहेत. निश्चीतच गोकुळच्या दुध व दुग्धजन्य पदार्थ याची चव आवडेल असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.

यावेळी उपस्थित संचालक बाबासाहेब चौगले, संघाचे मार्केटिंग अधिकारी लक्ष्मण धनवडे, उल्हास पाटील, शॉपीचे मालक रामगोंडा पाटील व दादा पाटील आदी उपस्थित होते.

या बातम्या देखील जास्त वाचल्या गेल्या…

युवकांना गाेकुळने संधी दिली.. दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांच्या हाताला काम- अनिल कारंजकर

दूध उत्पादक शेतकरी हा गोकुळचा कणा – अरुण डोंगळे

थेट अमेरिकेतून- विनायक कुलकर्णी! शेती आणि पंपकिन फेस्टिवल; अजून बरेच काही वाचा सविस्तर

चला…आता पाटगावला… मिळेल मध चाखायला!

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.