मोबाईल अॅपचा प्रारंभ! गोकुळ दूध संघ हा नेहमीच दूध उत्पादकांच्या हितासाठी प्रयत्नशील – सतेज पाटील

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

“फर्टीमीन व फर्टीमीन प्लस” नवीन ५ किलो पॅकिंग व पशुखाद्य मागणी मोबाईल अॅपचा प्रारंभ…

कोल्हापूर – महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त शतचंडी होम व महाप्रसादाचे आयोजन केले होते. याचे औचित्य साधून फर्टीमीन व फर्टीमीन प्लस या उत्पादनांचा ५ किलो पॅकिंग मधील विक्री प्रारंभ व पशुखाद्य मागणी मोबाईल अॅपचे उद्घाटन माजी गृह राज्यमंत्री, आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते व संघाचे चेअरमन अरुण डोंगळे तसेच संचालक मंडळ यांच्या उपस्थित संपन्न झाले.

या बातम्या देखिल जास्त वाचल्या गेल्या..

गोकुळ दूध संघ हा नेहमीच दूध उत्पादकांच्या हितासाठी प्रयत्नशील – सतेज पाटील

उद्घाटन प्रसंगी बोलताना माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील म्हणाले की, गोकुळ दूध संघ हा नेहमीच दूध उत्पादकांच्या हितासाठी प्रयत्नशील असून पशुखाद्य हा दुग्ध व्यवसायाचा पाया असल्याने सकस व गुणवत्तापूर्ण पशुखाद्य देणेसाठी गोकुळ नेहमीच कटिबद्ध आहे. म्हणूनच जिल्ह्यात सुमारे ९० ते ९५ % लोक गोकुळचे महालक्ष्मी पशुखाद्य वापरतात. गोकुळ हा दूध उत्पादकांचा संघ आहे या भावनेतून सातत्याने नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याची भूमिका आपण या ठिकाणी घेत आहोत. गोकुळ संघ मातृ संस्था असून दूध उत्पादकांच्या हितासाठी नवनवे उपक्रम राबवत असते उत्पादकांनी मागणी केलेले पशुखाद्य वेळेत पोहोच व्हावे यासाठी गोकुळने पशुखाद्य मागणीचे मोबाईल अॅप आजपासून सुरु केले आहे. या अँप चा फायदा प्राथमिक दूध संस्थांना नक्कीच होईल व कामकाजात सुसूत्रता येईल असे मनोगत व्यक्त केले. यावेळी महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमूडशिंगी व कागल एम.आय.डी.सी. येथे प्रतिदिनी ६०० टन इतके उत्पादन घेतल्यामुळे येथील कर्मचारी यांचे आमदार सतेज पाटील यांनी कौतुक केले.

या बातम्या देखिल जास्त वाचल्या गेल्या..

दूध उत्पादक शेतकरी हा गोकुळचा कणा – अरुण डोंगळे

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, फर्टीमीन व फर्टीमीन प्लस ५ किलो पॅकिंग मध्ये उपलब्ध व्हावे अशी मागणी संपर्क सभे मधून आल्याने त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन फर्टीमीन व फर्टीमीन प्लस ५ किलो पॅकिंग मध्ये उपलब्ध करून दिले आहे. तसेच पशुखाद्य मागणी मोबाईल ॲपच्या माध्यमातून पशुखाद्याची मागणी नोंद करणे, मागणीची स्थिती, क्रेडीट मेमो, येणे देणे रक्कम, खाते उतारा अशी सविस्तर माहिती दूध संस्थांना समजणार आहे. सर्व संस्थांनी या मोबाईल ॲप चा वापर करावा असे आवाहन चेअरमन डोंगळे यांनी केले.

ग्रामीण भागातील ग्राहकांनाही आता आस्वाद घेता येईल..-ऋतुराज पाटील

 

यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, जेष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक, बाबासाहेब चौगले, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील-चुयेकर, नंदकुमार ढेंगे, अमरसिंह पाटील, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे, आर. के. मोरे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, व्यवस्थापक डॉ. व्ही. डी. पाटील संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या बातम्या देखिल जास्त वाचल्या गेल्या..

युवकांना गाेकुळने संधी दिली.. दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांच्या हाताला काम- अनिल कारंजकर

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.