न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये G-20 परिषदेचे विद्यार्थ्यांनी केले आयोजन…

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

विनायक जितकर

भारत आणि इंडिया व इतर देशाच्या विविध मुद्द्यावर वादविवाद…

कोल्हापूर – श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये नुकतेच न्यू मॉडेल “G20 समिती 2023” या समितीच्या परिषदेचे आयोजन स्कूलच्या विद्यार्थी – विद्यार्थिनींच्या वतीने करण्यात आले होते. या परिषदेमध्ये वीस देशाच्या पंतप्रधान व अध्यक्ष यांच्या वेशभूषेमध्ये स्कूलमधील आठवी ते दहावीच्या विद्यार्थी – विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. या परिषदेमध्ये “जी 20” मधील सहभागी देशांच्या विविध समस्या आणि प्रगती या विषयावर चर्चा करण्यात आली.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

या कार्यक्रमामध्ये न्यू मॉडेल च्या काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी पत्रकार, छायाचित्रकार व कलाकार अशा विविध वेशभूषा मध्येही सहभागी झाले होते. त्यानंतर परिषदेमधील सहभागी विद्यार्थी पत्रकारांनी भारत आणि इंडिया व इतर देशाच्या विविध मुद्द्यावर वादविवाद केला. या कार्यक्रमांमधून विद्यार्थी – विद्यार्थ्यांनीना विविध देशाच्या संस्कृती विषयी. त्यांच्या समस्या विषयी आणि प्रगती विषयी कलाकृती, व्हिडिओग्राफी या विषयी माहिती मिळाली. अश्या प्रकारे न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल मध्ये “G20 समिती 2023” ची परिषद उत्कृष्ट रित्या पार पडली.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन गौरव मुरलीधर गावडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे यांच्या हस्ते आणि संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी मुरलीधर गावडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलच्या सुपरवायझर वहिदा शानेदिवाण आणि सुखदा विठ्ठल कुलकर्णी उपस्थित होत्या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये स्कूलचे अंदाजे ६०० ते ७०० विद्यार्थी सहभागी झाले होते.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.