प्रवाशांना दिलासा…राधानगरी आगारात ५ नव्या एस.टी. बस

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

ग्रामीण प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि वेगवान प्रवासाची सोय…

राधानगरी – राधानगरी तालुक्याच्या प्रवासी सेवेतील सोयीसुविधा वाढवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राधानगरी आगारात तब्बल पाच नव्या एस.टी. बसेस दाखल झाल्या. या बसेसचा लोकार्पण सोहळा राधानगरी आगारात पार पडला.

नव्या बसेसच्या आगमनाने ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक वेगवान, आरामदायी व सुरक्षित प्रवासाचा लाभ मिळणार असून तालुक्यातील संपर्क सेवा अधिक सक्षम होणार आहे. या निमित्ताने ग्रामीण जनतेला दर्जेदार वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मंत्री प्रकाश आबिटकर यांचे प्रयत्न पुढील काळातही सुरू राहतील. नव्या बसेस सुरू झाल्याने प्रवासी सेवेची क्षमता वाढून तालुक्यातील वाहतूक सेवा अधिक गतिमान होणार आहे.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आरडे, दीपक शेट्टी, विजय महाडिक, संग्राम पाटील, राजेंद्र चव्हाण, संजय मोहिते, संतोष तायशेट्टी, सुहास निंबाळकर, संजय पारकर, विलास रणदिवे, उमेश जाधव, संजय पालकर, शामराव चौगले, संतोष पाटील, सतीश फणसे, अनिल बडदारे, राम कदम, संदीप चौगले, विठ्ठल चौगले, जनार्दन चौगले, प्राध्यापक चंद्रशेखर कांबळे, विठ्ठल चव्हाण, वैभव चौगले, संजय पाचवडेकर, संजय मुरगुडे, महेश अडसूळ, मयूर पवार, कृष्णात पाटील, राधानगरी आगार प्रमुख उत्तम पाटील, राधानगरी आगरातील चालक वाहक यांच्यासह राधानगरी परिसरातील नामदार प्रेमी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.