“मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’ पुरस्कार” सोहळ्यात काय काय घडलं, वाचा सविस्तर

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

*मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’ पुरस्कार सोहळा संपन्न*

*समाजासाठी कार्य करणाऱ्या दिग्ग्ज मान्यवरांचा सन्मान*

मुंबई (रुपेश आठवले ):माध्यमांच्या आजच्या जडणघडणीचा अविभाज्य घटक असलेल्या आणि या वर्षी विशेष प्रभावशाली ठरलेल्या कला, सामाजिक, राजकारण अशा विविध विभागांमध्ये आपला जोरदार ठसा उमटवणाऱ्या मान्यवर दिग्गज व्यक्तींच्या कार्याचा गौरव ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’ देऊन करण्यात आला. माई मीडिया २४ प्रस्तुत मीडिया असोशिएशन ऑफ इंडियाच्या वतीने हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

विधान परिषद उपसभापती ,डॉ. नीलम गोऱ्हे यांना साहित्य क्षेत्रातील -ऐतिहासिक कार्यासाठी मीडिया एक्सलन्स २०२५ अवॉर्ड्स ने गौरविण्यात आले. यावेळी ‘माई मीडिया’ च्या कार्याचं कौतुक करताना व्रतासारखं सातत्याने हे काम करत राहणं हे खरचं अभिनंदनीय असल्याचं त्यांनी याप्रसंगी सांगितलं. ‘माई मीडिया’ च्या यापुढील सर्व उपक्रमांना शुभेच्छा देताना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन नीलम गोऱ्हे यांनी याप्रसंगी दिले.

पद्मश्री पुरस्काराचा आनंद आहेच. पण या पुरस्कारानंतर तुम्ही माध्यम प्रतिनिधींनी आपलेपणाने हा पुरस्कार मला दिला तो माझ्यासाठी अत्यंत मोलाचा असल्याची भावना पद्मश्री अभिनेते अशॊक सराफ यांनी व्यक्त केली.

जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल आभार व्यक्त करताना माध्यमांचा योग्य तो उपयोग होणं गरजेचं आहे असं सांगताना, सवांद साधत हा सवांद योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोहचवणायची जबाबदारी माध्यम प्रतिनिधि म्हणून आपण सगळ्यांनी घ्यायला हवी असं मत ज्येष्ठ पत्रकार नितीन केळकर यांनी व्यक्त केलं.

या पहिल्या वाहिल्या पत्रकार पुरस्कार सोहळ्यात माझ्या कामाची दखल घेतली याचा आनंद असून यापुढेही माझ्या या पत्रकार मित्रांसाठी चागलं काम करीन असं आश्वासन अभिनेते विजय पाटकर यांनी यावेळी दिलं. अभिनेते जयवंत वाडकर, दिपक करंजीकर यांनीही या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

या पुरस्कार सोहळ्याच्या समन्वयिका आणि ‘माई मीडिया’ संस्थापिका अध्यक्षा शीतल हरीष करदेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, आज माध्यमांचे स्वरूप बदलत चालले आहे. अशावेळी इतर काय करतात यापेक्षा आपण काय वेगळं करू शकतो या विचारातून मी हा पुरस्कार सोहळा करण्याचे ठरवले. या परकारितेच्या वाटचालीत मला अनेक चांगले स्नेही मिळाले त्यांनी मला प्रोत्साहन, दिलं.

अनेक जण खूप चांगली कामे करीत असतात अशा मान्यवरांचा सन्मान करायला मिळणं हे आमचं भाग्य आहे. समाजासाठी मोलाची कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्याची संधी ‘माई मीडिया’ ला मिळाली हा आमचा देखील गौरव आहे अशा भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या.

चांगल्या कार्यक्रमाचा भाग होता आल्याचा आनंद व्यक्त करताना अशा पुरस्कारांनी शाबासकीची जी थाप आपल्या पाठीवर पडते ती अजून चांगले काम करण्यासाठी खूप प्रेरणादायी ठरते’ अशी भावना सर्व सन्मानित मान्यवरांनी यावेळी बोलून दाखविली. एकापेक्षा एक बहारदार लोककलाविष्कार आणि त्याला मिळणारी उपस्थितांची उत्स्फूर्त दाद यामुळे ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५ ‘ नेत्रदीपक झाला.

*पुरस्कार प्राप्त मान्यवरांची नावे*

विधान परिषद उपसभापती ,डॉ. नीलम गोऱ्हे यांना साहित्य क्षेत्रातील -ऐतिहासिक कार्यासाठी मीडिया एक्सलन्स २०२५ अवॉर्ड् तर प्रा. राम शिंदे, सभापती (विधान परिषद), मा. ना. श्री.एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री), पद्मश्री महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते श्अशोक सराफ, अभिनेते  विजय पाटकर (माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ), नीलम शिर्के – सामंत (अध्यक्ष, बालरंगभूमी परिषद) आदि मान्यवरांचा ‘विशेष सत्कार’
सयाजी शिंदे(सामाजिक कार्य – निसर्ग संवर्धन), प्रसाद गावडे (रानमाणूस – उद्योग, पर्यटन क्षेत्र योगदान ), सुजाता रायकर ( आरोग्य क्षेत्र – थॅलेसेमिया मुक्ती दूत), डॉ. प्रदिप ढवळ (साहित्यक्षेत्र – सांस्कृतिक योगदान), ,अँड. संगिता चव्हाण (स्त्री सक्षमीकरण – सामाजिक कार्यकर्त्या), संतोष पवार ( सांस्कृतिक क्षेत्र- लोककला संवर्धन), वैदेही परशुरामी ( लक्षवेधी अभिनेत्री) नीतिन केळकर (पत्रकारिता जीवनगौरव), अनन्या गोयंका ( शिक्षण क्षेत्र – सामाजिक कार्य), किशोर आपटे (वरिष्ठ पत्रकार), मोहन बने ( ज्येष्ठ छायाचित्रकार), श्रीकांत बोजेवार ( ज्येष्ठ पत्रकार सल्लागार, महाराष्ट्र टाइम्स), संजीव भागवत (संशोधक पत्रकार दै. सकाळ), विशाल पाटील (संपादक,लोकशाही मराठी वृत्तवाहिनी), प्रेरणा जंगम ( पत्रकार सकाळ प्रीमियर), श्वेता वडके (वृत्तनिवेदिका, न्यूज 18 लोकमत), रविराज इळवे (कामगार कल्याण कार्य -महाराष्ट्र कामगार कल्याण आयुक्त),दिपक करंजीकर (कला, अर्थविश्लेषक) जयवंत वाडकर (कला), श्रुती राहुल (वृत्तनिवेदिका, Tv9 मराठी), अक्षय कुडकेलवार (रिपोर्टर, एनडीटीव्ही मराठी) श्रेयस सावंत (पत्रकार, पुढारी न्यूज), आनंद मुरुगकर ( डिजिटल मार्केटिंग, लॉकिझ स्टुडिओ)

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.