ElECTION:रवींद्र चव्हाण यांचा वाढतोय जनादर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

रविंद्र चव्हाण यांच्या प्रचारार्थ चौक सभांना मिळतोय प्रचंड प्रतिसाद

निवडणूक मतदान तारीख जवळ येतानाच चव्हाण यांचा वाढतोय जनादर

डोंबिवली, (आरती परब) : डोंबिवली शहर आणि भाजप – महायुती राष्ट्र हिताच्या विचारांनी जोडले गेले आहेत. त्यामुळेच भाजप – महायुतीला डोंबिवलीकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

डोंबिवली पश्चिम येथील सम्राट चौक येथे भाजप – महायुतीचे उमेदवार मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रचारार्थ चौक सभा पार पडली. त्या चौक सभेला देखील डोंबिवलीकरांचा उत्साहपूर्ण उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. “डोंबिवलीत कमळच फुलणार” असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला. येथील मतदार आपली संस्कृती, परंपरा कायम ठेवून इतिहास रचतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

मतदानाची ही तारिख जसजशी जवळ येतेय तसा चव्हाण यांचा जनादर वाढत चालला आहे. अनेक संस्थांनी त्यांच्या समर्थनार्थ स्वतःहून पाठिंबा जाहीर केले आहेत.

भाजप भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवाजी आव्हाड, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव मिहिर देसाई, भाजपा उत्तर भारतीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश सचिव ॲड. बिंदू दुबे, युवा सेना शहर पदाधिकारी राहुल म्हात्रे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष सुनिल फळदेसाई, आरपीआय शहर अध्यक्ष किशोर मगरे, आरपीआय शहर सचिव समाधान तायडे, युवा सेना सचिव कौस्तुभ फडके, ओमकार खेर, शिवसेनेच्या रश्मीताई गव्हाणे आदी वक्त्यांनी यावेळी आपली मतं मांडली.

या चौक सभेला पवन पाटील, समीर सुर्वे, कृष्णा पाटील, जावकर, कृष्णा परुळेकर, हरीश जावकर, मनीषा राणे, राहुल सकपाळ, शैलेश देशपांडे, स्वानंद भणगे, सीताराम कदम आदी भाजपा कार्यकर्ते तसेच राहुल म्हात्रे, सागर जेधे, कौस्तुभ फडके आदी शिवसैनिक उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.