संघात आदिती नरके, राधिका काणे, हुदा कापडी, मुग्धा पाटील, भार्गवी तोडकर यांचा समावेश…
कोल्हापूर – डॉ. डी. वाय.पाटील जुनिअर कॉलेज मुलींच्या संघाने शालेय शासकीय जिल्हास्तरीय (महापालिका) शासकीय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत १९ वर्षा खालील गटात प्रथम क्रमांक पटकावला. या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या संघात आदिती नरके, राधिका काणे, हुदा कापडी, मुग्धा पाटील, भार्गवी तोडकर यांचा समावेश आहे. या संघाने उपांत्य फेरीत कमला कॉलेज संघावर आणि अंतिम फेरीत विवेकानंद कॉलेजच्या संघावर विजय मिळविला.
विजयी संघाला संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, अशोकराव देसाई, प्राचार्य ए. बी. पाटील यांचे प्रोत्साहन आणि जिमखाना विभाग प्रमुख प्रा. सुदर्शन पोवार यांचे मार्गदर्शन लाभले.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.