![]() जय श्रीराम लिहिण्यावरून कोल्हापुरातील खासगी शाळेत तणाव दहावीच्या विद्यार्थ्यांने पत्रिकेवर लिहिलं जय श्रीराम शाळेतील शिक्षकेने विरोध करत विद्यार्थ्याला खडसावले शिवाजी पार्क परिसरातील शाळेत घडला प्रकार कोल्हापूर शहरातील शिवाजी पार्क परिसरात असणाऱ्या एका खासगी शाळेत धक्कादायक प्रकार घडला.. त्यामुळे शाळा व शाळा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. हिंदुत्वादी संघटनानी यावर आवाज उठविला.. मात्र अखेर पाेलिसानी याेग्य ताे समन्वय साधत या प्रकरणाची दखल घेत, पडदा टाकला. या खासगी शाळेतील एका दहावीच्या विद्यार्थ्याने परीक्षेच्या उत्तर पत्रिकेवर सुरुवातीला ‘जय श्रीराम’ लिहिलं होतं याला शाळेतील एका शिक्षिकेने विरोध करत जाब विचारला. आणि संबंधित विद्यार्थ्याला खडसावले. याबाबतची माहिती हिंदुत्ववादी संघटनांना मिळताच हिंदुत्ववादी कार्यकर्ते या शाळेत दाखल झाले. आणि जोरदार घोषणाबाजी केली. संबंधित शिक्षकेवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली. कोणत्याही जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांना कोणतेही धार्मिक बंधन न लावण्याची मागणी केली. या घटनेमुळे काही काळ येथील परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान याबाबतची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळतात शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय कुमार सिंदकर आपल्या कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. त्यांनी शाळा प्रशासन शिक्षिका, विद्यार्थी आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्यासोबत बैठक घेऊन झाल्या प्रकाराची सविस्तर घेतली. दरम्यान हिंदुत्ववादी संघटना शिक्षकेचे निलंबन करावे यावर ठाम राहिले. अखेर शाळा प्रशासनाने संबंधित शिक्षकेवर निलंबनाची कारवाई करत असल्याचे सांगितल्यानंतर हा तणाव निवळला. यावेळी शाळा परिसरात बघ्यांची गर्दी काही काळ जमली हाेती. मात्र पाेलिसांनी देखिल परिस्थितीचे भान राखत आणि हिंदुत्वावादी संघटनानी देखील शाळा, विद्यार्थी परिसर लक्षात घेता वेळीच या घटनेचे तीव्र पडदास उमटू दिले नाहीत. त्यामुळे काही काळाने परिसरात शांतता निर्माण झाली. ![]()
|