WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या नूतन कुलगुरूपदी डॉ. आर. के. शर्मा

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

नूतन कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा यांचे अभिनंदन करताना डॉ संजय डी. पाटील. समवेत पृथ्वीराज पाटील, डॉ. आर. के. मुदगल, डॉ. के. प्रथापन, डॉ. ए. के. गुप्ता, डॉ. व्ही. व्ही. भोसले.

कसबा बावडा –  डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे नवे कुलगुरू म्हणून डॉ. आर. के. शर्मा यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी केली. विद्यमान कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल यांचा कार्यकाल समाप्त झाल्याने डॉ. शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठात झालेल्या विशेष कार्यक्रमात नव्या कुलगुरुंनी सूत्रे स्वीकारली.

फेब्रुवारी २०२० पासून विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. आर. के. मुदगल कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात विद्यापीठाने फार्मसी कॉलेज, फ़िजिओथेरपी कॉलेज, अलाईड हेल्थ सायन्सेस, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट सारखी नवी महाविद्यालये सुरु झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापिठाला नॅकचे ‘ए++’ हे सर्वोच्च मानांकन मिळाले आहे. विद्यापीठाच्या प्रगतीमध्ये डॉ. मुदगल यांनी मोठे योगदान दिले असल्याचे गौरवोद्गार कुलपती डॉ. संजय पाटील यांनी यावेळी काढले.

डॉ. मुदगल यांचा कार्यकाल समाप्त होत असल्याने त्यासाठी राबवलेल्या अर्ज प्रक्रियेमध्ये देशभरातील ६५ जणांचे अर्ज प्राप्त झाले होते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार गठीत केलेल्या त्रिसदस्यीय समितीकडून त्यातील १५ जणांच्या मुलाखती घेऊन तीन उमेदवारांची नावे कुलपतींकडे सादर करण्यात आले होते. यामधून डॉ. आर. के. शर्मा यांची कुलगुरू पदासाठी निवड करण्यात आली आहे.

डॉ. शर्मा हे गेल्या ९ वर्षापासून डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता म्हणून कार्यरत असून ख्यातनाम स्त्रीरोग तज्ञ अशी त्यांची ओळख आहे. त्यापूर्वी त्यांनी आर्मी हॉस्पिटलमध्ये प्रदीर्घ सेवा दिली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) नियामक मंडळावर ते कार्यरत आहेत. त्यांना ४० वर्षांहून अधिक काळाचा शैक्षणिक व प्रशासकीय कार्याचा अनुभव आहे. मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी योगदान दिले आहे.

कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी मावळते कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत नवे कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा यांचे अभिनंदन केले. डॉ. शर्मा यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ आणखी नव्या उंचीवर पोहचेल असा विश्वास व्यक्त करताना पुढील पाच वर्षात जगातील ५०० विद्यापीठामध्ये डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा समावेश होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या कार्यक्रमात डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. आर. के. शर्मा, डॉ. शिंपा शर्मा, डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. के. प्रथापन, डॉ. ए. के. गुप्ता, डॉ. महादेव नरके, डॉ. अभिजित माने यांनी डॉ. मुदगल यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. स्नेहल शिंदे यांनी केले. यावेळी विविध संस्थांचे प्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.