डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये 9 रूग्णावर मणक्याच्या मोफत शस्त्रक्रिया…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

‘स्पाइन फौंडेशन’च्या सहकार्याने संयुक्त उपक्रम… डॉ. संजय डी. पाटील यांच्याशी चर्चा करताना डॉ. शेखर भोजराज. समवेत डॉ. राकेश कुमार शर्मा.

कोल्हापूर – डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे शुक्रवारी 9 रुग्णावर मणक्याच्या अत्यंत गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. स्पाईन फाऊंडेशन मुंबईचे प्रमुख व ख्यातनाम स्पाइन सर्जन डॉ. शेखर भोजराज यांच्या उपस्थितीत हॉस्पिटलच्या अस्थिरोग विभागाच्यावतीने या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्याची माहिती अस्थिरोग विभाग प्रमुख डॉ. एस. ए. लाड यांनी दिली.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

कोल्हापूर जिल्ह्यात विविध कारणामुळे विशेषत: शेतकरी व कष्टकरी लोकामध्ये मणका विकारचे प्रमाण वाढत आहे. अशा गरीब व गरजवंत रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी 5 ऑगस्ट रोजी हॉस्पिलमध्ये मोफत मणका शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डी वय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ संजय पाटील यांनी स्पाईन फाउंडेशनचे प्रमुख डॉ. शेखर भोजराज यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच फौंडेशनच्या कार्याला सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली. या शिबिरात गंभीर व गुंतागुंतीचे आजार असलेल्या 9 रुग्णावर यशस्वी शास्त्रक्रिया करण्यात आल्या. यात 4 रुग्णावर एकावर एक सरकलेले मणके जागेवर आणून ते स्क्रू, रॉडने फिक्स करण्यात (इंस्ट्रूमेंटेशन) आले. तर 5 रुग्णांच्या मणक्यातील दबलेल्या नसा शस्त्रक्रियेद्वारे मोकळ्या करण्यात आल्या.

स्पाईन फाऊंडेशनचे प्रमुख डॉ. शेखर भोजराज, डॉ हर्षित दवे, डॉ तोफिक, डॉ तुषार देवरे, डॉ मंदार बोर्डे आणि डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे अस्थिरोग विभाग प्रमुख डॉ. सलीम लाड, डॉ. प्रदीप पाटील, न्यूरोसर्जन डॉ. उदय घाटे, भूलतज्ज्ञ डॉ संदीप कदम, अस्थीरोग तज्ञ डॉ. उमेश जैन, डॉ. अमोल गोवारीकर, डॉ सूरज देशमुख व सहकाऱ्यानी या शस्त्रक्रिया केल्या. लवकरच हे रुग्ण उत्तमप्रकारे हिंडू – फिरू शकतील असा विश्वास डॉ. लाड यांनी यावेळी व्यक्त केला.

डी. वाय. पाटील हॉस्पिटल कदमवाडी येथे स्पाईन फाऊंडेशन मुंबई सहकार्याने मणक्याच्या आजारांवरील विशेष ओपीडी गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. या माध्यमातून आतापर्यत 1100 हून अधिक गरीब रुग्णाची तपासणी करण्यात आली आहे. तर गंभीर आजार असलेल्या 54 रूग्णावर मणक्याच्या गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. दर शुक्रवारी स्पाईन फाऊंडेशन मुंबईच्या सहकार्याने मणक्याच्या आजारांवरील विशेष ओपीडी सुरु आहे. यामध्ये सकाळी 9 ते 12 या कालावधीत रुग्णाची तपासणी केली जाते. डी वाय पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले.

कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल कुलसचिव डॉ. व्हि. व्ही. भोसले यांनी शस्त्रक्रिया करणाऱ्या सर्व वैद्यकीय अधिकारी व सहकारी यांचे अभिनंदन केले.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.