WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

LCB चा शोध; CRIME घडला, मात्र पथकाने गुन्हा असा शोधला!

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

कोल्हापूर: जिल्ह्यातील चंदगड येथील ATM मशिन व १८ लाख ७७ हजार ३०० रुपये पळवापळवी चा मोठा गुन्हा उघडकीस. राजस्थानच्या तरलीम इसा खान (२०), अलीशेर जमालु खान (२९), तालीम पप्पु खान (३०), अक्रम शाबु खान (२५) या चार अट्टल आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांनी पकडले.ही आव्हानात्मक कामगिरी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली LCB चे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या पथकाने मोठया जिद्दीने यशस्वी केली.

5 जानेवारी ला ATM मशीन फोडुन पैसे चोरी करणारे राजस्थान मधील ४ आरोपींना LCB च्या पथकाने ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापुर यांनी ही धडक कारवाई केली. 05 जानेवारी रोजी मध्यरात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने एस. बी. आय शाखा (कोवाड, ता. चंदगड, जि. कोल्हापुर) येथील ए.टी.एम सेंटर मधील ए.टी.एम मशीन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने कापून त्यातील 18,77,300/- रुपये इतकी रोख रक्कम केंवाबॉक्स सह चोरली. त्यानंतर चारचाकी वाहना मधुन ती पळवून नेली.मात्र या पळवापळवी च्या नादात आरोपी यांच्या वाहनांची धडक  पोलीसांचे सरकारी वाहनास बसली. तरीही त्यातुन ते पळून जाण्यात यशस्वी झाले.

या मोठ्या घटनेनंतर चंदगड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविला गेला. सार्वजनीक संपत्ती हानीप्रतीबंध अधि. 1984 चे कलम 3 प्रमाणे नेसरी येथेदोन गुन्हे दाखल झाले आहेत. या घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक  महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना तातडीने तपास करण्याचे आदेश दिले. हे आव्हान lcb चे कळमकर व त्यांच्या पथकाने लीलया पेलत, हा गुन्हा मोठ्या शिताफीने व कौशल्याने पूर्ण करीत पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांचा विश्वास सार्थ केला.

ए. टी. एम कटींग करून कैवश चोरी केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास पथके नेमून तात्काळ आरोपींना अटक करणेबाबत आदेश मिळताच,  सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे,  पोलीस उपनिरीक्षक जालींदर जाधव यांची दोन पथके व चंदगड पोलीस ठाणे याचे एक पथक तयार करून सापळा रचला. संपूर्ण परिसर पिंजून काढला. गुन्ह्याच्या अनुषंगाने घटनास्थळाचे परीसरातून माहीतीची जमवाजमव केली. सी. सी. व्ही फुटेज तपासले. त्यानंतर थोडाफार सुगावा लागला. मग पथकाने आणखी श्रम घेत, वरिष्ठांना माहिती देत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

या आरोपीनी  चारचाकी  हुंदाई कंपनीची क्रेटा वापरली असावा असा कयास केला.  पोलीस वाहनाने दिलेल्या धडकेमुळे ते वाहन रोडवर बंद पडलेले आढळून आले. त्यावेळी आरोपी यांनी गुन्हा करतेवेळी सदर वाहनाला MH-01- EB-9918 अशी बनावट नंबर प्लेट लावल्याचे निष्पन आले.  केटा गाडीची अधिक माहिती घेतली असता तिचा मूळ क्रमांक हा RJ-45-CY-1676 असा असल्याचे समजले. पुढे तपास करताना गाडी मालकाचे नाव सद्दाम खान (राहणार सामदिका, ता. पहाडी, जि. भरतपुर राज्य राजस्थान )असे पुढे आले.पथकाने विलंब न करता तत्काळ संबंधित पत्यावर एक तपास पथक पाठवून क्रेटा वाहन मालक सद्दाम खान याचा शोध घेतला . तो मिळून आला.

त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता, त्याचे मालकीची क्रेटा गाडी नं RJ-45-CY-1678 ही त्याचा मित्र तस्लीम खान यांने त्याचे नातेवाईक आजारी असल्याचे सांगून गाडी घेवुन गेल्याचे सांगितले. तसेच त्याची गाडी घेवुन गेल्यापासुन तस्लीम खान याने संपर्क साधला नसल्याचे सांगीतले. तस्लीम खान व त्यांचे संशयीत मित्र यांची माहिती प्राप्त करून त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. त्यानंतर तस्लीम खान व त्याचे सोबतचे संशयीत इसमांबाबत गोपनीय व तांत्रीक माहिती घेतली असता, आरोपी तस्लीम खान व त्याचे साथीदार हे पालघर जिल्ह्यातील मुंबई- अहमदाबाद रोडवरील मनोर गावातील सहारा मेवात धाबा परीसरात असल्याचे समजले.

त्यानंतर लागलीच सपोनि चेतन मसुटगे, दिपक घोरपडे, महेश पाटील, राजू कांबळे व हंबीर अतिये यांचे तपास पथक रवाना होऊन सहारा मेवात धाबा परीसरात साध्या वेशात सापळा लावला असता आरोपी तस्लीम खान व 3 संशयीत इसमांना सहारा मेवात धावा येथुन ताब्यात घेतले. संशयीत इसमांना नाव पत्ते समजले. सुरवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसांना पक्का विश्वास होता की हे चोरटे खोटे बोलत आहे. पोलिसी हिसका दाखविताच खरा घटनाक्रम पोलिसांच्या नजरेत आला.

पोलिसांनी आपल्या पोलीस शैलीत विचारल्यानंतर त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे 1) तरलीम इसा खान वय 20 रा. छोटे मश्जीद जवळ, सामविका, ता. पहाही, जि. भरतपुर राज्य राजस्थान, 2) अलीशेर जमालु खान वय-29 रा. बडे मश्जीव जवळ, सामविका, ता. पहाड़ी, जि. भरतपुर, राज्य राजस्थान, ३) तालीम पप्पु खान वय 28, रा. बहे मश्जीद जवळ, सामविका, ता. पहाडी, जि. भरतपुर राज्य राजस्थान, 4) अक्रम शाबु खान वय 25, रा. छोटे मश्जीद जवळ, सामदिका, ता. पहाडी, जि. भरतपुर राज्य राजस्थान असे सांगितले.

त्यानी गुन्ह्यातील रक्कम ही त्यांचे मित्र इसाईल, अकबर, सलीम यांचेकडे असल्याचे सांगितले त्यांचे ताब्यातुन रक्कम हस्तगत करण्याची प्रक्रीया चालू आहे. सदर आरोपीत यांना चंदगड पोलीसांचे ताब्यात दिले असून पुढील तपास चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील हे करीत आहेत. सदरची कामगिरी  पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित सतो,  अपर पोलीस अधीक्षक  निकेश खाटमोडे-पाटील  , उपविभागीय पोलीस अधिकारी गडहिंग्लज विभाग  रामदास इंगवले साो चांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस निरीक्षक,  रविंद्र कळमकर, चंदगड पो ठाणेचे पोलीस निरीक्षक  विश्वास पाटील, नेसरी पोलीस ठाणेचे सपोनि आबा गाढवे, स्था.मु.अ. शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस उप-निरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार दिपक चोरपडे, अमित सर्जे, महेश पाटील, राजु कांबळे, प्रशांत कांबळे, समीर कांबळे, हंबीर अतिये, अनिल जाधव, नामदेव यादव, नेसरी पोलीस ठाणेचे राजेंद्र पताडे, रामकुमार माने यांनी केले आहे.

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.