कोल्हापूर : जुना राजवाडा पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी चोरी करणाऱ्या ३ चोरट्यांना अटक; १० घरफोडीचे गुन्हे उघडकीस, चोरटे घराजवळचेच!
कोल्हापूर: कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी प्रकरणातील तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत १० घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, चोरीस गेलेले सुमारे २ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोकड, मोबाईल फोन आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना अटक केली.राजू गणपत माळी (वय २२ वर्षे), रा. राजगोपाल चौक, कोल्हापूर, विद्युत वसीम मलिक (वय २६ वर्ष, रा. जाधववाडी, कोल्हापूर) भीमराव दिनदे (वय २२ वर्षे), रा. पन्हाळा, कोल्हापूर अशी त्याची नावे आहेत.
त्याच्याकडून कडून पोलिसांनी २,००,०००/- किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने. रोकड व मोबाईल फोन जप्त केले आहेत. या यशस्वी कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस अमंलदार वैभव पाटील, गजानन गुरव, प्रदिप पाटील, प्रविण पाटील, विशाल खराडे, महेंद्र कोरवी, संतोष बरगे, परशुराम गुजरे, योगेश गोसावी, अरविंद पाटील, शिवानंद मठपती व राजेश राठोड यांचे अभिनंदन केले आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. या आरोपींविरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.