भाजपचा विजय अधोरेखित

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

मधुसुदन पत्की – ज्येष्ठ पत्रकार.

भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे.त्यांचे अभिनंदन . भारतीय जनता पक्षाने आपले निवडणुकीतले वर्चस्व कायम राखले आहे. भाजप हा कायम निवडणूकसज्ज असणारा पक्ष आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. एकूणच माजी उपराष्ट्र्पती धनकड यांच्या राजीनाम्या नंतर विशेषतः त्यांच्या अनाकलनीय आजार नंतर गायब होण्या नंतर भाजप ही निवडणूक कशी हाताळणार असा प्रश्न होता. एक नक्की होते , ज्या प्रकारे श्री. धनकड यांना बाजूला केले होते त्या मागे नक्की जबरदस्त व्युहरचना भाजपने आखलेली होती. मुळात विरोधकांना हा राजीनामा धक्कादायक होता. त्यातून सावरून आणि उमेदवार देऊन त्याच्या विजयासाठी व्युहरचना करणे सोपे नव्हते. सहाजिकच राधाकृष्णन सहज विजयी झाले.

सी. पी. राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची ४५२ मते मिळाली, तर इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना पहिल्या पसंतीची ३०० मते मिळाली. एकूण ७६७ खासदारांनी मतदान केले होते. यातील १५ मते अवैध ठरली, तर ७५२ मते वैध होती. विरोधी उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली आहेत. त्यामुळे ऐनवेळी इंडिया आघाडीची मते फुटली असल्याचे स्पष्ट झाले आहे. सी. पी. राधाकृष्णन हे आता भारताचे १७ वे उपराष्ट्रपती आहेत. निकालाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास इंडिया आघाडीतून क्रॉस वोटिंग झाले असल्याचे समोर आले आहे. एनडीएकडे एकूण ४२७ खासदार होते, मात्र जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसच्या अकरा खासदारांनी राधाकृष्णन यांना मतदान केले, त्यामुळे हा आकडा ४३८ पर्यंत पोहोचते. मात्र सीपी राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची एकूण ४५२ मते मिळाली, याचा अर्थ १४ विरोधी खासदारांनी एनडीए उमेदवाराला मते दिली. याच कारणामुळे बी. सुदर्शन रेड्डी यांना पहिल्या पसंतीची ३१४ मते मिळायला हवी होती, मात्र त्यांना तीनशेच मतांवर समाधान मानावे लागले.

सी. पी. राधाकृष्णन हे तामिळनाडूतील भाजपचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांचे पूर्ण नाव चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन आहे. राधाकृष्णन यांचा जन्म २० ऑक्टोबर १९५७ रोजी तामिळनाडूतील तिरुपूर येथे झाला. त्यांनी कोइम्बतूर येथील चिदंबरम कॉलेजमधून बीबीए केले आहे. ते १९७३ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले. कालांतराने ते जनसंघात सामील झाले आणि सक्रिय राजकारणात आले.सी. पी. राधाकृष्णन हे दक्षिण भारतातील भाजपच्या महत्वाचे नेते आहेत. ते भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्यही आहेत. ते केरळचे प्रभारी देखील होते.

२००४ , २०१२ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते कोइम्बतूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार होते. त्यांनी महाराष्ट्र, झारखंड, तेलंगणाचे राज्यपाल म्हणूनही काम केलेले आहे.आज त्यांच्याकडे अनुभव ,संघटन , तांत्रिक माहिती, अधिकार आणि एक अभेद्य ताकद आज त्यांच्या पाठीशी आहे. राज्यसभेचे ते पदसिद्ध सभापती ते आता आहेत. सहाजिकच त्याची जबाबदारी आता वाढली आहे. ते केवळ भाजपचे प्रतिनिधी आता नाहीत ़.

पहिल्यादा त्यांना राज्यसभेवर निवडून गेल्यावर सभागृह चालवणे आणि महत्वाची विधेयके मंजूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील . सगळ्यांना समान न्याय देणे हा आता त्याचा सभागृहातला धर्म असेल . एक झाले मतपत्रिकेवर निवडणूक झाली .विरोधकांची मते फुटली .त्यांचा पराभव झाला. काँग्रेसला याचे परिणाम बिहार निवडणुकीत ही भोगावे लागतील. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षात एकमत नाही हे सिद्ध झाले आहे. तेंव्हा याचा काँग्रेसने पुन्हा एकदा शांत चित्ताने विचार करावा.तसेच माजी न्या.बी.सुदर्शन रेड्डी यांचे कौतुक केले पाहिजे. हरणारी लढाई आपण लढत आहोत हे माहिती असताना पराभवाला शांतपणे सामोरे जाणे याचे कौतुक केलेच पाहिजे.कदाचित ते पुढील काही दिवसात ,काँग्रेसला संधी मिळाली तर सभापती राधाकृष्णन यांच्या समोर सभागृहात दिसतील.त्यांनाही शुभेच्छा..!

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.