घडल… असं, झाली बातमी…उपमुख्यमंत्री शिंदेनी दिला विमानात धीर…

लाडक्या बहिणीसाठी एकनाथ शिंदेंची धाव किडनीच्या आजाराने ग्रस्त महिलेला दिला धीर स्वतःच्या चार्टर्ड विमानाने आणले मुंबईत…

मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’*

*सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान, व्यक्तीमत्वांचा, आपल्या माणसांचा !

*’मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’*

प्रसारमाध्यमे ही समाजाचा महत्त्वाचा भाग बनली आहेत. ती फक्त माहितीचा स्रोत नसून समाजाचे प्रतिबिंब, आणि दिशादर्शक आहेत. योग्य व जबाबदारीने त्यांचा वापर केला गेला, तर ती लोकशाहीच्या हितासाठी मोलाची ठरू शकतात.

माध्यमांच्या बहरलेल्या वटवृक्षाच्या जडणघडणीत आजवर असंख्य सुवर्णहातांचं योगदान लाभलं आहे. पडद्यावर आणि पडद्यामागं राहूनही काही चेहऱ्यांनी केलेली कामगिरी ही सुवर्णमोलाची आहे. माध्यमांना वेगळा आयाम देण्यात या व्यक्तींचा खूप मोलाचा वाटा आहे. या परीसरूपी हातांचं कौतुक होणं आज गरजेचं आहे.

माध्यमांच्या आजच्या जडणघडणीचा अविभाज्य घटक असलेल्या आणि या वर्षी विशेष प्रभावशाली ठरलेल्या कला, सामाजिक, राजकारण अशा विविध विभागांमध्ये आपला जोरदार ठसा उमटवणाऱ्या मान्यवर दिग्ग्ज व्यक्तींच्या कार्याचा गौरव माई मीडिया २४ प्रस्तुत मीडिया असोशिएशन ऑफ इंडियाच्या ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५ ‘ देऊन केला जाणार आहे. येत्या ३ जूनला हा पुरस्कार सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क दादर येथे रंगणार आहे.

मा. ना. श्री.एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री), पद्मश्री महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते श्री.अशोक सराफ, श्री. विजय पाटकर, अभिनेते (माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ), प्रा. राम शिंदे, सभापती (विधान परिषद) नीलमताई शिर्के – सामंत (अध्यक्ष, बालरंगभूमी परिषद) आदि मान्यवरांचा विशेष गौरव या पुरस्कार सोहळ्यात केला जाणार आहे.

त्यासोबत सयाजी शिंदे(सामाजिक कार्य – निसर्ग संवर्धन), प्रसाद गावडे (रानमाणूस – उद्योग, पर्यटन क्षेत्र योगदान ), डॉ. नीलम गोऱ्हे (साहित्य क्षेत्र-ऐतिहासिक कार्य ), सुजाता रायकर ( आरोग्य क्षेत्र – थॅलेसेमिया मुक्ती दूत), डॉ. प्रदिप ढवळ (साहित्यक्षेत्र – सांस्कृतिक योगदान), ,अँड. संगिता चव्हाण (स्त्री सक्षमीकरण – सामाजिक कार्यकर्त्या), संतोष पवार ( सांस्कृतिक क्षेत्र- लोककला संवर्धन), वैदेही परशुरामी ( लक्षवेधी अभिनेत्री) नीतिन केळकर (पत्रकारिता जीवनगौरव), अनन्या गोयंका ( शिक्षण क्षेत्र – सामाजिक कार्य), किशोर आपटे (वरिष्ठ पत्रकार), मोहन बने ( ज्येष्ठ छायाचित्रकार), श्रीकांत बोजेवार ( ज्येष्ठ पत्रकार सल्लागार, महाराष्ट्र टाइम्स), संजीव भागवत (संशोधक पत्रकार दै. सकाळ), विशाल पाटील (संपादक,लोकशाही मराठी वृत्तवाहिनी), प्रेरणा जंगम ( पत्रकार सकाळ प्रीमियर), श्वेता वडके (वृत्तनिवेदिका, न्यूज 18 लोकमत), रविराज इळवे (कामगार कल्याण कार्य महाराष्ट्र कामगार कल्याण आयुक्त) या सोहळ्याला कला सामजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. हा केवळ पुरस्कार सोहळा नसून थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र, मराठी भाषा, उद्योग, शेतकरी निसर्ग संवर्धन, पर्यावरण पर्यटन या विषयी जागर होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

या पुरस्कार सोहळ्याचे समन्वयक – संस्थापिका अध्यक्षा शीतल हरीष करदेकर, कार्याध्यक्ष – सचिन चिटणीस, कपिल देशपांडे, व्यवस्थापन/तांत्रिक – चेतन काशीकर, लक्ष्मीकांत घोणसे पाटील, कलाविभाग – गणेश तळेकर, सुरज खरटमल, विजय कांबळे आहेत. प्लॅनेट मराठीचे सहकार्य या पुरस्कार सोहळ्याला लाभले आहे.

समाजमाध्यम क्षेत्रातील स्वतंत्र पत्रकार व फोटो जर्नालिस्टस यांचे प्रसारमाध्यम असून; देशपातळीवर प्रसारमाध्यमांच्या सर्वसमावेशक विकास, सन्मान व सक्षमीकरणासाठी आधारस्तंभ असणारी ‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’ (माई) ही संस्था सामाजिक, आरोग्य, सांस्कृतिक आदि विषय केवळ बातमीतून न मांडता सक्रीय सहभाग घेण्याचे काम करतेय. लोकजागर चळवळ यातून ‘उभी होतेय अशी ही माई आहे. या संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा शीतल हरीष करदेकर आहेत.

लातूर आणि नांदेडमध्ये केंद्र सक्षमीकरण अभियान

गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या उपस्थितीत लातूर नांदेडमध्ये केंद्र सक्षमीकरण अभियान उत्साहात नाशिक (प्रतिनिधी): अखिल भारतीय श्री…

जास्त दूध दर देण्यासाठी कटिबद्ध – नविद मुश्रीफ

दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दूध दर देण्यासाठी कटिबद्ध- नविद मुश्रीफ ;चेअरमन, गोकुळ  कोल्‍हापूर: गोकुळ दूध…

खर्‍या अर्थाने झाला ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद !- सनातन संस्था

*ऐतिहासिक, भव्य-दिव्य अन् शिस्तबद्ध आयोजन !* *खर्‍या अर्थाने झाला ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद !* – सनातन संस्था…

डोळ्यावर पट्टी… पायात स्केट्स… आणि मनात विजयी संकल्प

डोळ्यावर पट्टी… पायात स्केट्स… आणि मनात विजयी संकल्प कोल्हापूर | रुपेश आठवले: समाजात सकारात्मकता पेरणाऱ्या Positive…

!!धर्मासाठी हिंदूंना कट्टर व्हावेच लागेल !!

*‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सव : २० हजारांच्या उपस्थितीत ‘सनातन राष्ट्र संकल्प धर्मसभा’* *समाजाला अधर्माचा प्रतिकार करण्यासाठी…

सरनोबवाडीत विजया दीपक कांबळे यांची उपसरपंचपदी निवड

सरनोबवाडीत सौ. विजया दीपक कांबळे यांची उपसरपंचपदी निवड सरनोबवाडी (ता. कागल) | ग्रामपंचायत सरनोबवाडी येथे नुकत्याच…

अलमट्टीच्या उंची वाढीबाबत प्रशासन गंभीर नाही – संतोष पाटील

अलमट्टीच्या उंची वाढीबाबत प्रशासन गंभीर नाही – प्रवक्ते संतोष पाटील यांचा सवाल सांगली, प्रतिनिधी: अलमट्टी धरणाच्या…

निसर्गाच्या सानिध्यात अक्षरांचे मैत्र! ‘वाचू आनंदाने’ उपक्रमाने चिपळूणमध्ये रंगला वाचनसोहळा

निसर्गाच्या सानिध्यात अक्षरांचे मैत्र! ‘वाचू आनंदाने’ उपक्रमाने चिपळूणमध्ये रंगला वाचनसोहळा चिपळूण |शेखर धोंगडे चिपळूण नगर परिषदेच्या…