काेल्हापूरःजिममध्ये कमी कष्टात ‘मसल्स’ बनवण्याच्या हव्यासातून तरुण पिढीचा जीव धोक्यात घालणाऱ्या ‘मेफेनटेरमाईन सल्फेट’ (Mephentermine Sulphate) या घातक इंजेक्शनचा काळा व्यापार करणाऱ्या इसमावर LCB कोल्हापूर (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा) ने आज कारवाई करत 63 इंजेक्शन्ससह आरोपीस अटक केली आहे.अमोल अशोक पाटील (वय 34, रा. प्रयाग चिखली, ता. करवीर) हा रजपूतवाडीतील क्रांती लॉजिंग समोर इंजेक्शन विक्रीस येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तत्काळ सापळा रचत अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या आदेशानुसार व अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. यामध्ये एलसीबी पथकाने एकूण ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. मुद्देमाल पंचनामा करून कायदेशीर प्रक्रिया राबवत करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंजेक्शन आरोपीने कोठून आणले? या मागे आणखी कोणतं रॅकेट सक्रिय आहे का? याचा तपास करवीर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवेपोलीस अंमलदार: सत्यजित तानुगडे, वैभव पाटील, महेंद्र कोरवी, परशुराम गुजरे, संतोष बरगे, गजानन गुरव, प्रदीप पाटील, विशाल खराडे, शिवानंद मठपती, अरविंद पाटील, राजू कांबळे, योगेश गोसावी यांनी ही कारवाई केली.
काय आहे हे ‘मेफेनटेरमाईन सल्फेट’?डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरल्यास जीवघेणा ठरणारा हा इंजेक्शन रक्तदाब वाढवणारे औषध असून, शरीरातील अवयव निकामी होण्यापर्यंत गंभीर दुष्परिणाम घडू शकतात. तरीही काही जिममधील तरुण हे इंजेक्शन मसल्स वाढवण्यासाठी वापरत आहेत, ही चिंताजनक बाब आहे. |
-
मेफेनटेरमाईन सल्फेट इंजेक्शन – 63 बाटल्या
-
मोबाईल हँडसेट – 1
-
एकूण किंमत – ₹73,000/-
“जवळच्या जिममध्ये जर कोणी अशा घातक औषधांची विक्री करत असेल, तर तात्काळ पोलिसांना माहिती द्या. आपल्या तरुणाईचा जीव महत्त्वाचा आहे!”-POSITIVEWATCH TEAM – शासन मित्र.. पाेलीस मित्र, पत्रकार मित्र समाज मित्र. |