भाजपा एनजीओ सेल तर्फे मुंबईतील नागरिकांना मोफत भाजीपाला वाटप

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

मुंबई : सध्या श्रावण महिना सुरू असून भाजीची दर गगनाला भिडले आहेत अशात आता मुंबईतील चाळीतील व झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना सध्या उत्तम प्रकारचा भाजीपाला मोफत मिळत आहे. भाजपचा एनजीओ सेल हा उपक्रम फेब्रुवारी महिन्यापासून मुंबईच्या विविध वार्डात राबवत आहे त्यामुळे आतापर्यंत लाखो नागरिकांना याचा थेट फायदा मिळाला आहे. सध्या फक्त भाजीपाला नसून अनेक वस्तूंचे वाटप देखील भाजपा एनजीओ सेल मार्फत केले जाते. यासाठी भाजपचे देशातील व मुंबईतील अनेक एनजीओशी संलग्न अशा रीतीने हे काम करत आहे. असाच एक भाग म्हणून मानखुर्द विधानसभा मतदारसंघात एनजीओ सेल अध्यक्षा प्रणिती घोटणे व पदाधिकाऱ्यांच्या मार्फत अवितरीत हे कार्य सुरू असून आत्तापर्यंत विधानसभेच्या बहुसंख्य विभागात हे कार्य पोहोचले आहे.

भाजपा हा मागील एका दशकाहून अधिक काळ देशात सत्तेत आहे तसेच आता महाराष्ट्रात देखील भाजपची सत्ता आहे. भाजपाला सत्ताधारी होण्यासाठी भाजपचा विविध विभागांची अनमोल साथ मिळाली यातील थेट जनसंपर्क असलेला विभाग म्हणजे एनजीओ सेल मानावा लागेल. अनेक उच्चशिक्षित पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा भरणा असलेला हा सेल स्वयंसेवी भावनेतून मुंबईतील नागरिकांच्या गरजांवर अभ्यास करून त्या सोडविण्याचा प्रयत्न करत असतो. यासाठी एनजीओ सेलने अनेक उपक्रम हाती घेतले आहे यामध्ये सध्या आरोग्य हा महत्त्वाचा विषय प्रामुख्याने असल्याचा दिसत आहे. भाजपा एनजीओ सेलला नेहमीच मध्यमवर्गीय नागरिकांत पौष्टिक पदार्थ वाटप करताना पाहिले आहे यामध्ये सध्या आरोग्यदायी बॉर्नविटा हा भाजीपाला सोबत वाटप करण्यात येत आहे.

एनजीओ सेल हा मुंबईतील भाजप वार्ड अध्यक्ष यांच्या समन्वयातून गरजू लोकांची यादी तयार करून त्यांच्या लोकसंख्येनुसार व गरजेनुसार वस्तूंची उपलब्धता करत वाटप करण्यात येत असते. विशेष म्हणजे फक्त भाजप पदाधिकारी नसून इतर पक्षातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांना देखील गरजू नागरिकांबाबत विचारणा केली जाते त्यामुळे हा लाभ एकंदर मुंबईतील सर्वच घटकांमध्ये पारदर्शकतेने वितरित होत आहे.

विना प्रसिद्धी स्वयंसेवी भावनेने काम करत असलेला भाजपा एनजीओ सेल हा सध्या मात्र नागरिकांत मोठ्या प्रमाणात चर्चेस आला आहे. श्रावण महिन्यातील भाजीपाल्यांचे दर वाढत असताना मोफत भाजीपाला वाटप करून श्रद्धाळू व भाविकांना मोठा हातभार लागल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. भाजपा एनजीओ सेल मुंबईतील अनेक स्वयंसेवी संस्था व स्वतःच्या वस्तू वाटपांसाठी आपले जवळपास २५० लोकांचे मनुष्यबळ वापरत आहे तसेच त्यास भाजपा पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांची सुद्धा साथ असल्याने हे संख्याबळ हजारोच्या संख्येने असल्याने लाखो लोकांना याचा थेट फायदा होत आहे.

सध्या भाजपा एनजीओ सेल मुंबई अध्यक्ष हेमांग जांगला यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनखाली हे सर्व वितरण होत आहे. हेमांग जंगला हे स्वतः अर्थतज्ञ असल्याने गरजू नागरिकांच्या गरजा ओळखत अचूक वस्तूंची उपलब्धता करण्यात यशस्वी दिसत आहेत. विविध स्वयंसेवी संस्था यांच्याशी समन्वय साधण्यात देखील ते कमालीचे यशस्वी झाले आहेत. आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत त्यामुळे सर्वच पक्ष यांनी विविध उपक्रम हाती घेतले असताना भाजपा एनजीओ सेल हा चाळी व झोपडपट्ट्यांमधील नागरिकांमध्ये नागरिकांना पारदर्शकतेने विविध मोफत मदत वाटप करत असल्याने सध्या सर्वात अग्रणी ठरत आहे. नागरिकांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता भाजपाच्या “मिशन मुंबई’ साठी लोकसभा, विधानसभा सारखीच कामगिरी मुंबई एनजीओ सेल करेल असा विश्वास पदाधिकारी यांना आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.