जितो कोल्हापूरचा स्नेहमेळावा_अवॉर्ड प्रदान उत्साहात

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापूर जितो चॅप्टरचा स्नेहमेळावा हॉटेल सयाजी येथे नुकताच झाला. यावेळी जितोचे पदाधिकारी व पुरस्कारने गौरविण्यात आलेले मान्यवर.

_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-

जितो कोल्हापूरचा स्नेहमेळावा व अवॉर्ड प्रदान उत्साहात

कोल्हापूर – जितो कोल्हापूर चॅप्टरचा स्नेहमेळावा हॉटेल सयाजी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. मागील दोन वर्षांमध्ये चाप्टरतर्फे समाजोपयोगी केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला.

यावेळी २०० हून अधिक सभासद व जैनबांधव उपस्थित होते. मेळाव्यामध्ये चार अवॉर्ड देण्यात आले आहे. जितो लाईफ टाईम अवार्ड जसवंत शहा यांना देण्यात आला. जितो सोशल अवॉर्ड हा इचलकरंजी येथील व्यावसायिक रवींद्र देवमोरे यांना देण्यात आला. जितो बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड हा प्रकाश राठोड यांना देण्यात आला. जितो यूथ एंटरप्रनर अवार्ड तरुण उद्योजक आशीष देसाई यांना देण्यात आला. आहे. स्वागत गिरीश शहा यांनी केले. चीफ सेक्रेटरी अनिल पाटील यांनी मागील दोन वर्षांतील कार्याचा आढावा घेतला. लेडीज विंग अध्यक्ष श्रेया गांधी यांनी लेडीज विंगचे कार्यक्रम आणि यूथ विंगचे चेअरमन चिंतन राठोड यांनी यूथ विंगच्या कार्याचा आढावा घेतला. जेएटीएफमार्फत यशस्वी झालेल्या शासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जितेंद्र राठोड यांनी कोल्हापूर चॅप्टरने केलेल्या कार्याचे कौतुक केले. नवीन कार्यकालासाठी अध्यक्ष म्हणून निवड झालेले रवी संघवी यांचा सत्कार करण्यात आला. सभासद व निमंत्रितांसाठी बहारदार संगीत कार्यक्रम ठेवला होता. जीतो श्रमणआरोग्य ट्रस्टी अरुण ललवाणी यांचा सत्कार केला. यावेळी रमण संघवी, शीतल कोरडे, शेखर आडके, राजीव पारीख, शीतल गांधी, जय कुमार पारीख, युवराज ओसवाल, चंद्रकांत ओसवाल, संदीप पटणी, अमृत पारिख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.