![]() |
||
चिपळूण- गुन्हा घडला…. नजरेसमाेर तरुण पाेरगा गेला.. .क्षणात हाेत्याचं नव्हत. झाल. लग्नाला आलेल्या सर्व कुटुंबियाचा हिरमाेड झाला. सर्वांवर दुखःचा डाेंगर काेसळला. मंडगड, धाराशिव एसटी बसने सकाळ सकाळच आठ वाजता घात केला.. चालकाची वेगवान एस. टी. बस थेट थांबलेल्या तरुणाच्या अंगावर गेली.. माेठा अपघात घडला. यात बापाच्या समाेरच काळजाचा तुकडा गेला.. अपघातच इतका भयानक हाेता. पाहणाऱ्यांच्याही अंगावर शहारा आणणारा हाेता..चिपळूण (जि. रत्नागिरी) तालुक्यातील खेर्डी येथे दत्त मंदिरावजवळ घडलेला अपघात आज अनेकांच्या डाेळ्यात अश्रू आणणारा ठरला. हृदय द्रावक… वडिलांसमोरच उमद्या मुलाला एसटीने चिरडले…! ही बातमी वाऱ्यासारखी अख्या चिपळूणात पसरली. नि गर्दी जमली. खरतर ही घटना व अपघातच तसा हाेता. काळाचा घाला कोणावर कधी येईल याची शाश्वता देता येत नाही याचा प्रत्यय आज चिपळूण मध्ये पाहायला मिळाला… भाजी दुकानात भाजी घेत असलेल्या वडिलांसमोरच आपल्या उमद्या तरुण मुलाचा घात केला. समाेरून भरधाव वेगात येणाऱ्या एसटीने चिरडल्याने अनेकांचा संताप अनावर झाला. चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथे हा घडलेल्या अपघाताची नाेंद चिपळूण पाेलिसात झाली आहे. या अपघातात तीस वर्षीय अनिकेत विजय दाभोळकर आचे या अपघाता निधन झाले आहे. आज (गुरुवारी) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी जिल्ह्यातील खेर्डी दत्त मंदिराजवळ विजय दाभोळकर हे आपला मुलगा अनिकेत सह भाजी खरेदीसाठी गेले होते. यावेळी विजय दाभोळकर हे भाजी घेत असताना अनिकेत हा काही अंतरावरच आपल्या दुचाकी वर वडिलांची वाट पाहत होता. इतक्यात मंडणगडहून धाराशिव कडे निघालेली महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची भरधाव बसने जोराची धडक देऊन दुचाकीजवळ थांबलेल्या अनिकेतला सुमारे 30 फूट फरपटत नेले. या एस. टी. बसची धडक इतकी जाेराची हाेती. की क्षणभर वडिलांना देखिल समजले नाही, मुलगा काेठे गेला.. नेमक काय घडलं. आणि जेव्हा समजल, जे दिसले ते भयावह दृष्य पाहून, वडिलांनी अक्षरक्षः हंबरडाच फाेडला… दाभाेळकर कुटुंबियांवर दुखःचा डाेंगरच काेसळला. या झालेल्या अपघातात तर दुचाकीच्या चिंधल्या चिंधडल्या झाल्या हाेत्या… गाडीचा अक्षरक्षा गाेळा झाल्याचे प्रत्यक्षदर्शनी दिसत हाेते. ![]() अपघात हाेताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ अनिकेत दाभोळकर याला रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता .आपल्या डोळ्यासमोरच आपल्या मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याचं पाहून वडिलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. अनिकेत दाभोळकर हा कोकण रेल्वे मध्ये रत्नागिरीत कार्यालय अधीक्षक म्हणून कार्यरत होता. एकच दिवसापूर्वी त्याच्या लहान भावाचा विवाह संपन्न झाला होता. त्यामुळे दाभोळकर यांच्या घरी सुरू असलेल्या आनंद सोहळ्यावर काळाने घाला घातल्यामुळे विरजन पडलं आहे. याबाबतची फिर्याद आप्पाजी बाळा दाभोळकर यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दिली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या अपघातानंतर मात्र एस. टी. चालक, रस्ता सुरक्षा, वेगावरील नियंत्रण, चालक प्रशिक्षण यावर मात्र अनेक प्रश्न व चर्चा अपघातस्थळी सुरु हाेती.. इतक्या सकाळीच अपघात कसा काय झाला, एकतर बहाद्दूरशेखवरून सुटलेली एस.टी. बस वर्दळीच्या रस्त्यावर वेग कसा घेऊ शकते… यासारख्या उलटसुलट चर्चा येथे सुरु हाेती. (सीसीटीव्ही, व्हायरल व्हीडीओ पहा..निळ्या लिंकला क्लिक करा) https://youtu.be/P6xBmdP6Ayw?si=SC1eRCfYCbV_bMrC
|